सरपंच आरक्षणावरच सत्तेची गणिते

Gram Panchayat Members' Attention On Sarpanch Reservation Kolhapur Marathi News
Gram Panchayat Members' Attention On Sarpanch Reservation Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा अनोखा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यापुढे पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु, जाहीर होणाऱ्या आरक्षणाचे सदस्य बहुमताच्या आघाडीकडे की अल्पमतातील विरोधकांकडे आहेत, यावरच ग्रामपंचायतीच्या सत्तेची गणिते फिरणार आहेत. यामुळे गावपुढाऱ्यांसह इच्छुकांची धडधड वाढली आहे. दरम्यान, या सोडतीसाठी 2005 पासूनच्या तीन आरक्षणांचा विचार होणार असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील बहुतांश गावच्या निवडणुकीत मतदारांनी एकहाती सत्ता सोपविली नसल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. पूर्ण बहुमत असलेली गावे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. अशा गावांमध्ये कोणतेही आरक्षण पडल्यास सत्तारूढांचा कोणताच तोटा होणार नाही. परंतु, मतदारांनी दोन्ही आघाड्यांमधील उमेदवारांना वेचून निवडून दिली असतील तर मात्र आरक्षण काय पडणार, याची चिंता संबधित गावपुढाऱ्यांना लागली आहे.

बहुमत असलेल्या आघाडीतील सदस्यांत जर सरपंच आरक्षणाचा सदस्य नसेल तर पंचाईत होणार आहे. बहुमत असूनही उपसरपंचपदावर समाधान मानून पाच वर्षे कारभार हाकावा लागणार आहे. अशा ठिकाणी अल्पमतात असलेल्या आघाडीतील सदस्याचे नशीब चमकणार आहे. या विचित्र राजकीय परिस्थितीच्या गावांमध्ये सत्तेची गणिते विस्कटणार असून मतदारांनी पाठविलेल्या सत्तारूढांना महिन्याभरातच विरोधकाच्या भूमिकेत जावे लागण्याची वेळ येणार आहे. 

अनेक ग्रामपंचायतीत काठावर बहुमत तर काही ठिकाणी त्रिशंकूचे चित्र आहे. अशा ठिकाणी सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधातील सदस्यांना "ऑफर' देण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्‍यातील एका गावात दोन आघाडीचे समान बलाबल असून तिसऱ्या आघाडीतून विजयी झालेल्या सदस्यावर तेथील सत्ता ठरणार आहे. त्यासाठी त्याला एका आघाडीकडून दिलेली लाखोंची ऑफर धुडकावून दुसऱ्या पॅनेलमध्ये दाखल झाल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे. हे एक प्रातिनिधीक उदाहरण असले तरी काठावरील बहुमत आणि आरक्षण काय पडणार या भितीने विरोधकांकडील आरक्षित जागेवर निवडलेल्या सदस्याला सोबत घेण्याचा अटापिटाही सुरू झाल्याचे चित्र आहे. 

"क्वॉलीटी'वर उमेदवारांना निवडले 
अनेक गावांमध्ये मतदारांनी वैयक्तिक "क्वॉलीटी'वर उमेदवारांना निवडले आहे. परिणामी गावात रिंगणात असलेल्या सर्व पॅनेलमधून असे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सत्तेसाठी आता रस्सीखेच सुरू असून सदस्यांना एकमेकांच्या आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपसरपंच पदापासून विविध आमिषेही दाखविण्यात येत असल्याची चर्चा आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com