Gram Panchayat Results : हातकणंगले तालुक्यात दहा ग्रामपंचयातींमध्ये सत्तांतर 

gram panchayat result 2021 maharashtra kolhapur hatkanangale taluka
gram panchayat result 2021 maharashtra kolhapur hatkanangale taluka

हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. मोठ्या ग्रामपंचायती असतानाही अवघ्या तीन तासात प्रशासनाने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली. 20 ग्रामपंचायतीसाठी नोटासाठी झालेले 2 हजार 941 मतदान उमेदवार व नेत्यांना चिंतन करायला लावणारे ठरले आहे. 

ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकी साठी गेले 15 दिवस प्रचार शिगेला पोहचला होता. निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटातच टोकाची ईर्षा रंगली होती. आज सकाळी आठ वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, अप्पर तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार दिगंबर सानप आदिच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच झुंडीने कार्यकर्ते तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा होत होते. निकाल लागेल तसा कार्यकर्ताचा जल्लोष सुरू होता. हौशी कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. 

पाडळी ग्रामपंचायतीत घोगराई विकास पॅनेल यांनी बाजी मारली असून सत्तांतर झाले आहे. विजयी उमेदवार - निवृत्ती वाघमोडे, शिवाजी पाटील, सुजाता पाटील, रविंद्र पाटील-मेथे, भाग्यश्री गायकवाड, ऐश्वर्या पाटील, श्रीधर पाटील, विभा पाटील, कोडींबा पोवार, उषा दाभाडे, नुरजहॉं दरवेशी शेख मलंग. 
मनपाडळे ग्रामपंचायतीत सत्ताधारींची सत्ता कायम राखली आहे. विजयी उमेदवार - उल्हास वाघमारे, निता कुरणे, शिल्पा पाटील, माणिक खांडेकर, शंकर सुर्यवंशी, बाळाबाई गुरव, अनिल घोडके, राजलक्ष्मी पाटील, रायबा शिंदे, अरुणा वाघमारे. 
वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचयतीमध्ये सत्तांतर झाले. विजयी उमेदवार - सचिन कुंभार, सुहास पाटील, सुरेखा मस्के, महेश शिर्के, अशवनी कुंभार, सुशिला चौगुले, गजेंद्र माळी, महेश कुंभार, सुजाता मगदूम, राहूल पोवार, सचिन कांबळे, नाजूका भुजिगे. 

हालोडी ग्रामपंचायती सत्ताधारींचीच सत्ता. विजयी उमेदवार - किरण कांबळे, महावीर पाटील, वर्धमान बेळकें, सुनिता शेटे, अजय पाटील. 

किणी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर. विजयी उमेदवार - सचिन पाटील, योगिता दणाणे, प्रवीण कुरणे, सुजाता धनवडे, सुप्रिया समुद्रे, संताजी माने, मनिषा शेळके. बिरदेववाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर. विजयी उमेदवार - रामचंद्र नाईक, सरिता धनगर, बाबासो खरात, संगिता वाघमोडे, सतिश कागले, शेवंता नाईक. 

तिळवणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर. विजयी उमेदवार - राजेश पाटील, मंगल मिणचेकर, अरुणा कुंभार, निवास कोळी, निता चव्हाण, सुकुमार चव्हाण, सिंधू माने, शबाना एकसंबे. 

रुई ग्रामपंचायतीमध्ये शाहूविकास आघाडीचा झेंडा. विजयी उमेदवार - अवधूत कुलकणी, करिष्मा मुजावर, शालन बेनाड, अशोक आदमाने, शालाबाई साठे, जितेद्र यादव, रेखा पाटील, अभकुमा काश्‍मीरे, गीता सावंत, युनूस मकानदार, शकीला कोन्नूर, गौतम उपाध्ये, सुभाष चौगुले, आश्वनी पोवार. 
दुर्गवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाचपैकी चार जागा बिनविरोध झाल्या. विजयी उमेदवार- सचिन घोलप. 

चंदूर ग्रामपंचायत आवाडे प्रणीत सभापती महेश पाटील गटाचे वर्चस्व. विजयी उमेदवार - भगवान पुजारी, संजय जिंदे, रोहणी घोरपडे, मारुती पुजारी, वैशाली पाटील, संदीप कांबळे, अनिता माने, ललीता पुजारी, महादेव पाटील, सचिन पुजारी, स्वाती कदम, बाबासो मगंसुळे, स्नेहल कांबळे, शालन पाटील, फिरोज शेख, योगिता हळदे. 


नेज ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर. विजयी उमेदवार - आकाश शिंगे, शुभम खोत, ज्योती नेर्ल, मनोज कांबळे, सजाबाई कांबळे, हनिफा मुल्ला, अमोल चव्हाण, ज्योती नेजकर, रमेश घाटगे, दिपाली गोंधळी, विद्या चव्हाण. 

माणगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी. विजयी उमेदवार - मनोज आदाणा, वसुधा बन्ने, अमर उपाध्ये, सुधाराणी पाटील, अभय मगदूम, स्वप्नील माने, नितीन कांबळे, संध्याराणी जाधव, गुलाब अख्तर हुसेन भालदार, प्रकाश पाटील, रमिजा जमादार, राजगोंडा पाटील, विद्या जोग. 

जंगमवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतार. विजयी उमेदवार - चंपाबाई खोत, महानंदा खोत, संभाजी मोरे, चंपाबाई खोत, चिंदानंद खोत, स्नेहा खोत. 

मिणचे ग्रामपंचायतीमध्ये युवा शक्ती आघाडीची सत्ता कायम. विजयी उमेदवार - संभाजी जाधव, सावित्री नाईक, सविता वाकसे, अभिनंदन शिखरे, शाकीरा मुजावर, महादेव परीट, नलिनी जाधव, सुजीत वायदंडे, निलम घाटगे, अजय कांबळे, जब्बार ईलाई मोमीन, रंजना जाधव. 

वाठार तर्फ उदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्यने विजयाचा झेंडा रोवला. विजयी उमेदवार - मारूती शिंदे, ताई अनूसे, शोभा शिंदे, कृष्णा वठारकर, जावेद पाथरवट, रिना शिंदे, विजय कागवाडे, मंगल परीट, दत्तायत्र पाटील, कोमल शिंगे, उज्वला शिंगे. 

लाटवडे ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर. विजयी उमेदवार - बाळासो भोपळे, किरण धनगर, राधीका पाटील, संभाजी पवार, रेखा नाईक, निशा पाटील, किरण पाटील, दिनकर पाटील, स्वाती पाटील, महादेव पाटील, हर्षदा कांबळे, विमल कोळी, रणजीत पाटील, नलिमा सकटे. 

कबनूर ग्रामपंचायतीत सत्ता कायम. विजयी उमेदवार - समीर जमादार, सुधीर लिगाडे, सुनिता आडके, मधुकर मणेरे, रजनी गुरव, रोहिणी स्वामी, उत्तम पाटील, स्वाती काडाप्पा, साहिफ शहाबुद्दीन मुजावर, अर्चना पाटील, सिंधू महाजन, कुमार कांबळे, सुलोचना कट्टी, शोभा पोवार, सुनिल काडाप्पा, प्रवीण जाधव, सुधाराणी पाटील. 

खोची ग्रामपंचायतीमध्ये संमीश्र सत्ता. विजयी उमेदवार - प्रमोद सुर्यवंशी, स्वाती सिद्ध, प्रमोद गुरव, वैशाली वाघ, राजकुमार पाटील, प्रतिक्षा आडके, जगदीश पाटील, पूनम गुरव, स्नेहा पाटील, सुहास गुरव, कमल ढाले, रोहनी पाटील. 

माणगांववाडीमध्ये सत्ता कायम राहिली. सागर खोत व दिपाली खोत बिनविरोध. भाऊसो खोत, पुष्पलता कुंभार, सुजाता खोत, बाळासो खोत, आकाशी मायगोंडा.

 हे पण वाचाGram Panchayat Results : आबिटकर गटाची बाजी ; माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची आघाडी पराभूत    
 
मातब्बर पराभूत 
582 उमेदवारांपैकी अनेक मातब्बर या निवडणूकीत पराभूत झाले. यामध्ये प्रामुख्याने खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर सर्मथक झाकीर भालदार, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण मगदूम, माजी उपसरपंच राजू जगदाळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
दोन- तीन मतांनी पराभव 
रुई येथे ईर्षने मतदान झाले. प्रभाग दोनमधून दिपाली सकटे यांना 541 तर वर्षा घायतिडक यांना 539 मते मिळाली. प्रभाग सहामधून अश्वीनी पोवार यांना 474 तर सपना शिंदे यांना 471 मते मिळाली केवळ दोन व तीन मतानी पराभव झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागणी फेटाळली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com