कुशिरे ग्रामस्थांनी चार महिने सांभाळलेली आजी अखेर आली मुलीच्या घरी

 The grandmother, who had been taken care of by the Kushire villagers for four months, finally came to the girl's house
The grandmother, who had been taken care of by the Kushire villagers for four months, finally came to the girl's house
Updated on

पोहाळे तर्फ आळते  ः नाशिक जिल्ह्यातील आजी मार्च महिन्यात अंबाबाई, जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने कोल्हापुरात आली होती. गावी जाण्यासाठी निघाली, तेवढ्यात कोल्हापूर जिल्हा कोरोनामुळे लॉकडाउन झाला. आजीने जोतिबा डोंगर पायवाटेतून कुशिरे गाव गाठले. तोपर्यंत रात्र झाली होती. तिने हनुमान मंदिरात असरा घेतला लॉकडाउनमुळे चार महिने कुशिरे (ता. पन्हाळा) येथे राहण्याची वेळ आली. श्रीमती किसनाबाई गणेश चकोर (रा. निराळी ता. सिन्नूर जिल्हा नाशिक) असे त्यांचे नाव आहे. 
आज त्यांना त्यांच्या मुलीकडे मोहपाडा (ता. खालापूर जि. रायगड) येथे पाठविण्यात आले. 
मार्च महिन्यात आलेल्या या आजीला गाव परका व माणसं परकी होती. आजी भेदरलेल्या अवस्थेत होती. तिला आणून गावातील हनुमान मंदिरात सोडले. ग्रामस्थांनी तिला धीर दिला. शेजारी पाजारी असणाऱ्या महिलांनी तिच्या आरोग्याची काळजी घेतली. दक्षता समितीने तिच्या जेवणाची व्यवस्था केली. तलाठी सुवर्णा कराड यांनी दररोज जेवणाच्या डबा तिला खाऊ घातला. दीड महिन्यापासून आजीची घालमेल फार वाढली. "माय मला घरी पाठव गं'.. अशा विनवण्या करत होती. लॉकडाउनमुळे अडचणी येत होत्या; 
पण जिल्हाबंदी असल्यामुळे अडचणी येत होत्या. तलाठी सौ. कराड यांनी तिला विश्वासात घेऊन तिची कौटुंबिक माहिती घेतली. तिच्या मूळ गावी महसूल यंत्रणेमार्फत शोध घेतला व तिच्या मुलगीचा दूरध्वनी क्रमांक मिळविला आणि या आजीने मुलीबरोबर मोबाईलद्वारे संभाषण केले. त्यानंतर आजी निवांत राहिली. उद्यापासून जिल्हा बंदी असल्याने तिला आज पाठविण्यासाठी दक्षता समिती, तलाठी, तहसीलदार यांनी ईपास काढून मोटारीने तिच्या मुलीकडे मोहपाडा (ता. खालापूर जि. रायगड) येथे आज पाठविले आले. तसेच कुशिरे सरपंच अनुराधा घोरपडे, पोलिसपाटील संदीप माळवी, संतोष साबळे पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, निवासी तहसीलदार कौलवकर, मंडल अधिकारी दाणी व तलाठी सौ. सुवर्णा कराड यांचे विशेष सहकार्य लाभले. आजीने आपल्या अश्रूतून मदत केलेल्या लोकांचे हात जोडून अभार मानले. 

कुशिरे (ता. पन्हाळा, कोल्हापूर) ग्रामस्थांनी चार महिने या आजीचा चांगल्याप्रकारे सांभाळ करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आजीच्या नातेवाइकांचा मी शोध घेऊन, तिच्या मुलीशी बोलणे करून दिले. आज तिला आम्ही महसूल यंत्रणेमार्फत मुलीकडे मोहपाडा ता. खालापूर जि. रायगड या ठिकाणी चारचाकी वाहनातून पाठविले.'' 
- सुवर्णा कराड, तलाठी कुशिरे तर्फ ठाणे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com