गारगोटी शहरातील किराणा दुकाने फक्त या वेळेतच राहणार सुरु...

gargoti
gargoti
Updated on

गारगोटी - जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गारगोटी शहरातील किराणा दुकाने व बाजारपेठ उद्यापासून सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत  खुली करण्यात येईल. तर भुदरगड तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकाने दिवसभर सुरू राहतील. मात्र दुकानदार, नागरिक, वाहनधारकांकडून     आदेशांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयासमोर 'सोशल डिस्टनसिंग' पाळत आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार अमोल कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, पोलिस निरीक्षक संजय पतंगे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सरपंच संदेश भोपळे, धनाजी खोत यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच जयवंत गोरे, ग्रामपंचायत सदस्य अलकेश कांदळकर, बजरंग कुरळे, विजय कोटकर, राहुल कांबळे, सचिन देसाई, जितेंद्र भाट, बंटी सूर्यवंशी, गौतम कांबळे, प्रशांत गुरव, सतीश सावंत, अजित चौगले, रणधीर शिंदे, सनी गायकवाड, प्रकाश वास्कर, ओमकार कौलवकर आदी उपस्थित होते.

चर्चेतील मुद्दे असे -

  •  अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर वाहनांना गारगोटीत प्रवेश नाही                                      *
  • दुकानदार व ग्राहकांना सुरक्षित अंतर व मास्क वापरण्यास सक्ती
  • खरेदीसाठी दुचाकी रस्त्यावर घेऊन येणाऱ्यावर कारवाई         
  • सर्व दुकानदारांनी ठळक जागी दरफलक लावावे                                    
  •  दुकानदार, ग्राहकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई                                
  • कामाव्यतिरिक्त बाहेरून ये-जा करणाऱ्यांवर कारवाई

बाहेर जाऊ नका; आत घेऊ नका 

गारगोटी शहरातून कोणीही बाहेर जाऊ नये व कोणीही आत येऊ नये याची जबाबदारी सर्वांचीच  आहे. जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिक, दुकानदारांना सवलत दिली असली तरी सर्वांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. शहरात वाहने घेऊन फिरणाऱ्यावर व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.  

- डॉ. संपत खिलारी   प्रांताधिकारी, भुदरगड-आजरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com