''जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी''

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

कोणताही एक मतदार संघ काँग्रेसला द्या तो उमेदवार निवडूनआणण्याची जबाबदारी माजी

कोल्हापूर : पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघापैकी कोणतीही एक जागा काँग्रेसला द्या ती निवडून आणण्याची जवाबदारी आपली राहील अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली . भाजपच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्क ट्रॅक्टर रॅली नंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . पाटील म्हणाले, पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झालीआहे. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमानात नोंदणी झाली आहे. 

कोणताही एक मतदार संघ काँग्रेसला द्या तो उमेदवार निवडूनआणण्याची जबाबदारी माजी राहील. या निमित्ताने विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा आणखीन एक उमेदवार निवडून येईल त्यामुळे काँग्रेसचे संख्या बाळ  निश्चितच  वाढेल.
 
 पाटील यांनी हे भाषण हिंदितून केले.  उमेदवार ''जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी'' असे त्यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांना अश्वस्त केले .पुणे पदवीधरची जागा राष्टवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने किमान शिक्षक  मतदार संघाची जागा तरी काँग्रेसले मिळावी यासाठी हे  आवाहन महत्वाचे समजले जाते. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Satej Patil speaking at a public meeting kolhapur