आजऱ्यात घनसाळची कापणी सुरू

रणजित कालेकर
Monday, 16 November 2020

आजरा तालुक्‍यात सुगीचे काम अंतिम टप्यात आहे. अधिक कालावधीची गरवी भात कापणीच्या कामाला सुरवात झाली आहे. यामध्ये घनसाळ, काळाजीरगा या भातांचा समावेश आहे.

आजरा : आजरा तालुक्‍यात सुगीचे काम अंतिम टप्यात आहे. अधिक कालावधीची गरवी भात कापणीच्या कामाला सुरवात झाली आहे. यामध्ये घनसाळ, काळाजीरगा या भातांचा समावेश आहे. दिवाळी उरकल्यानंतर शेतकरी या भाताच्या कापणी व मळणीमध्ये गुंतणार आहेत. त्याचबरोबर नागली काढणीची कामे देखील सुरू होणार आहेत. 

तालुक्‍यात 9 हजार 700 हेक्‍टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. यामध्ये सुमारे तीनशे हेक्‍टर क्षेत्रावर घनसाळ व काळा जीरगा याची लागवड झाली आहे. घनसाळ व काळाजीरगा भाताची कापणी सुरु झाली आहे. तालुक्‍यातील सुमारे 9 हजार 400 हेक्‍टरवरील भात पिकाची कापणी व मळणीची कामे झाली आहेत.

ऑक्‍टोंबर महीन्यात अवकाळी पाऊसाचा फटका भात पिका बरोबर अन्य पिकांना बसला. कापणीस आलेल्या भाताने जमिनीवर लोळण घेतली होती. शेतवडीत पाणीच पाणी साचले होते. पाण्यातील भात कापणी करतांना शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. उन पडल्याने सुगीच्या कामांना गती मिळाली आहे. घनसाळ व नागली काढणीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. दिवाळी सण उरकल्यावर ही कामे सुरू होतील. 

गवत कापणीला येणार वेग 
माळरान पडून असल्याने या वर येणारे गवत शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरतात. नोव्हेंबर अखेरीस गवत कापणीला सुरवात होते. यंदाही आठवड्याभरात गवत कापणीला सुरवात होणार असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harvesting Of Paddy In Ajara Begins Kolhapur Marathi News