esakal | Video : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे; काय म्हणाले मुश्रीफ पाहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif Minister for Rural Development criticism on parambir singh case political marathi news

 परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे जे आरोप केले आहेत  ते आरोप खोटे आहेत.

Video : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे; काय म्हणाले मुश्रीफ पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : परमबीर सिंग यांनी केंद्र सरकारशी हातमिळवणी केली आहे. ते माफीचा साक्षीदार होऊ इच्छितात. दोन दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. परमवीर सिंग यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करणे ही भाजपची सोची समझी चाल आहे. वाजे प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी ते आरोप करत आहेत. आजच ते का बोलतात असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई होऊ नये. अशी टिका त्यांनी सोशल मिडीयावर केली आहे.

परमवीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी केलेला हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने अन्वय नायक प्रकरणांमध्ये अर्णव गोस्वामी यांना अटक केले. टीआरपी प्रकरणांमध्ये अर्णव गोस्वामी यांच्यावर आरोप केले ज्या उत्साहाने पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांच्यावर कारवाई केली या घटनेने भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर नाराज होता.सचिन वाझे प्रकरणातून निसटण्यासाठी , स्वतःला वाचवण्यासाठी दिलेले हे पत्र हे कारस्थान असू शकते.

हेही वाचा- कमवा, शिका योजनेत  गतवर्षी 70 मुलींनी घेतला लाभ

मुश्रीफ पुढे म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस दोन दिवस दिल्लीत बसले होते. 1 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर हे पत्र प्रसिद्ध झालं. यामुळे संशय बळावत आहे. त्यांना माफीचा साक्षीदार करण्याचं ठरवले आहे. म्हणून एवढे मोठे धाडस  एका सरकारच्या मंत्राचे करण्याचं काम माझी आयुक्त परमविर सिंह यांनी केले आहे.

डेलकर प्रकरणा संदर्भात ते म्हणाले, मोहन डेलकर जे खासदार होते. जे सहा वेळा निवडून आले होते त्यांनी आत्महत्या केली हे प्रकरण याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावरून माझी आता खात्रीच झाली आहे . भारतीय जनता पक्षाने हे कटकारस्थान केले आहे. जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य आहे त्यामुळे पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. भारतीय जनता पक्ष सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे.
 ते सातत्याने खटाटोप  करत असतात. आता हे हाणून पडण्याची आवश्यकता आहे. अनिल देशमुखांची चौकशी व्हायची ती होईल मात्र परमवीर परम सिंह यांना माफीचा साक्षीदार करण्याचं ठरविण्यात आले आहे असं माझं ठाम मत आहे.

संपादन- अर्चना बनगे

go to top