राजकीय चर्चेला आले उधाण : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची उदया निवड 

अतुल मंडपे
Thursday, 21 January 2021

चंदकांत दादा पाटील, विनय कोरे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील चर्चेनंतर नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

हातकणंगले (कोल्हापूर) :  हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड उदया (२२) रोजी होणार असून त्यासाठी मोठया प्रमाणांवर राजकिय घडामोडी सुरू आहेत. जनसुराज्यचे डॉ. प्रदिप पाटील ( टोप) आणि भाजपाचे उत्तम सावंत ( नागांव) यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता असून चंदकांत दादा पाटील, विनय कोरे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील चर्चेनंतर नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

 भाजपचे पाच, जनसुराज्यचे पाच, शिवसेना दोन, शेतकरी संघटना दोन, कौग्रेस एक आणि अपक्ष एक असे सोळा सदस्य एकत्र आले असून आवाडे प्रणित ताराराणी आघाडीचे पाच सदस्य बाजूला पडले आहेत तर  भाजपाचे एक सदस्य तटस्थ आहेत.

बावीस सदस्यीय  हातकणंगले पंचायत समितीमध्ये भाजपा सहा, शिवसेना दोन, जनसुराज्य पाच, ताराराणी आघाडी पाच, शेतकरी संघटना दोन, कॉग्रेस एक व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. सुरुवातीला भाजपा आणि जनसुराज्याने एकत्र येत सत्ता मिळवली. त्यावेळी भाजपाच्या रेशमा सनदी या सभापती झाल्या तर उर्वरीत काळांत जनसुराज्यच्या सरितादेवी मोहिते यांना संधी मिळाली.

हेही वाचा- रस्ते अरुंद; वाहने मात्र उदंड -
    
अडिच वर्षांनी आरक्षण बदलले आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतिपद आरक्षित झाले. यावेळी आवाडे प्रणित ताराराणी आघाडीचे पाच शिवसेना दोन, संघटना दोन, कॉग्रेस एक, अपक्ष एक व भाजपच्या एका फुटीर सदस्याला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. आणि महेश पाटील ( आवाडे गट) सभापती झाले. त्यांनी मुदतीत राजीनामा न दिल्याने सर्व सदस्यांनी एकत्र येत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला.त्यामुळे राजकिय समीकरणे पूर्णतः बदलली असून आता भाजपा, शेतकरी संघटना, शिवसेना, जनसुराज्य, कॉग्रेस एक व एक अपक्ष असे सोळा सदस्य एकत्र आले आहेत. त्यामुळे उदया होणाऱ्या निवडीत भाजपा किंवा जनसुराज्य ला संधी मिळण्याची शक्यता असून अंतिम निवडीचा चेंडू नेते मंडळीच्या कोर्टात आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatkanangle Panchayat Samiti election for the post of Chairman kolhapur political news