ते गावात आले आणि गावाची झोपच का उडाली ते वाचाच

प्रतिनिधी
मंगळवार, 30 जून 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, करवीर तालुक्‍यात खळबळजनक घटना घडली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले 41 नागरिक सीपीआरमध्ये तपासणी न करताच नाक्‍यावरून थेट घरी निघून गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, करवीर तालुक्‍यात खळबळजनक घटना घडली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले 41 नागरिक सीपीआरमध्ये तपासणी न करताच नाक्‍यावरून थेट घरी निघून गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या नागरिकांनी सीपीआरला येऊन स्वतःहून तपासणी न केल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे. दरम्यान, बालिंगा येथे आठ नागरिक आल्याची नोंद नाक्‍यावर आहे; मात्र ग्रामपंचायत व तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता एकही व्यक्ती गावात आलेली नाही. मग हे लोक गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टोल नाका या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना पुढील तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात येते. 18 ते 29 जूनअखेर करवीर तालुक्‍यातील 41 नागरिक थेट घरी गेले आहेत. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला पाठवल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. 

तपासणी न करता थेट गावात आलेले व नाक्‍यावर नोंद नागरिक असे : 
* बाचणी 2 * दिंडेवाडी 1 * चुये 1 * मुडशिंगी 5 * भुयेवाडी 2 * गांधीनगर 1 * आरे 2 * भामटे 1 * उचगाव 1 * बालिंगा 8 * दिंडनेर्ली 3 * आमशी 1 * चिंचवाड 11. 

बाहेरून आलेले नागरिक सीपीआरमध्ये चेकअप न करताच परस्पर घरी गेले आहेत. त्यांच्याशी फोनवर संपर्क सुरू आहे. काही नागरिकांनी चेकअप केले आहे. ज्यांनी चेकअप केले नाही त्यांनी तातडीने चेक-अपला यावे; अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- डॉ. जी. डी. नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी, करवीर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He came to the village and read why the village fell asleep