"मागेल त्याला शेततळ्या'चा लाभ नाहीच 

He doesn't have the benefit of a farm
He doesn't have the benefit of a farm

कोल्हापूर : कोरोना संर्सगाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना यावर्षी मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, वनशेती, गटशेती यासह इतर नऊ योजनांचा लाभ घेता येणार नाही. या सर्व योजना राबविण्याबाबत कृषि अधिक्षक अधिकारी कार्यालयाला अद्यापही कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात चांगल्या आणि शेतकऱ्यांना लाभदायक असणाऱ्या योजनांचा बोजवारा उडणार आहे. 

राज्यातील पावसावर आधारीत कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना भाजप सरकारने आणली. यामुळे, शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला.

ज्याला आपल्या शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यांना या तळ्यांमुळे चांगली शेती फुलविता आली. दरम्यान, या योजनेला यावर्षी "खो' बसणार आहे. शेतकऱ्यांना आवश्‍यक यांत्रिकीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि यांत्रिकीकरणाच्या पायावरच शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर, कृषी अवजारे घेण्यासाठी 40 ते 50 टक्के अनुदान दिले जाते होते. यावषी याचे नियोजन झालेले नाही. अल्पभूधारक आणि कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे 2022 पर्यंत उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार होते. यासाठभ फुंडकर फळ-बागा योजना राबवली जात होती.

कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी गटशेती करुन आपले उत्पन्न वाढवावे यासाठी गटशेतीचे नियोजन करण्यात आले होते. शासनाकडून अशा गटशेतीला प्रोत्साहन म्हणून आर्िर्थक अनुदान दिले होते. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनाही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे. शेतीवर आधारीत असणाऱ्या 65 टक्के लोकांना याचा फायदा होते होता. प्रत्येक वर्षी या योजनेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार होती. 2019 मध्ये याला मदत मिळाली, यावर्षी मात्र कोरोनामुळे या योजनेला काही काळासाठी का असेना पण गुंडाळावी लागली आहे. 

या योजना राबविण्यासाठी अद्याप सूचना नाहीत : 
- मागेल त्याला शेततळे 
- कृषि यांत्रिकीकरण उपअभियान 
- फुंडकर फळबाग लागवड योजना 
- वनशेती 
- मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना 
- एकात्मिक फलोत्पादन विकास योजना हिरतगृह, शेडनेट, अस्तरीकरण 
-गटशेती 
- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना 

या योजना राबवल्या जाणार : 
- राष्ट्रीय अन्न, सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत-कडधान्य व तृणधान्य कार्यक्रम 
-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 
-कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम 
- राष्ट्रीय कृषि योजना अंतर्गत भात बियाणे साखळी विकसित करण्याचा कार्यक्रम 
-क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com