‘पणन’च्या मदतीने शेतीमाल परदेशी शक्‍य

शिवाजी यादव  
Thursday, 29 October 2020

कोरोना लॉकडाउन काळात अनेक व्यवसाय डबघाईला आले. अशा स्थितीत पणन मंडळाने गुणवत्तापूर्ण शेतीमालाला परदेशी बाजारपेठेत चांगला दर असल्याने हामाल परदेशात पाठविण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे

कोल्हापूर  - वर्षभर राबवून पिकविलेला शेतीमाल गुणवत्तापूर्ण आहे. मात्र, त्याला स्थानिक बाजारपेठेत पुरेसा दर नाही, मिळाला तर उत्पादन खर्च भागत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होतात. त्यांना पणन मंडळ दिलासा देत आहे. गुणवत्तापूर्ण शेतीमाल परदेशी बाजारपेठेत विकण्यासाठी मंडळातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच भाग म्हणून पणन मंडळाच्या सहकाऱ्याने शेतकऱ्यांचा दीड हजार टन शेतीमाल कोरोनाकाळात परदेशी पाठविला. पुढील काळात शेतीमाल परदेशी पाठविण्याबाबत पणन मंडळ शेतकऱ्यांना नियममित मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. 

कोरोना लॉकडाउन काळात अनेक व्यवसाय डबघाईला आले. अशा स्थितीत पणन मंडळाने गुणवत्तापूर्ण शेतीमालाला परदेशी बाजारपेठेत चांगला दर असल्याने हामाल परदेशात पाठविण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केळी, सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब व केळी परदेशी बाजारपेठेत पणनच्या सहयोगाने पाठविली.  पणन मंडळाने स्थानीक शेतीमाल परदेशी पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद होत्या. स्थानीक पातळीवर माल वाहतुकीचे टेंपो एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात तसेच परदेशासह पाठविता येत नव्हता अशा स्थितीत स्थानीक प्रशासनाशी संवाद साधून कोरोनाकाळातही सर्व परवानग्या घेतल्या. त्यानंतर केंद्रीय निर्यात प्राधिकरणाची मंजूरी मिळाल्यानंतर दीड हजार टन फळे, तिन टप्प्यात जहाजाव्दारे बहारीन, अबूधाबी दुबईसह अन्य देशात माल पाठविला आहे. 

हे पण वाचा - PHOTO : कोल्हापुरच्या अवलियाने फोटोग्राफीतून उलगडले पक्षांचे विश्व 

पणनच्या प्रशिक्षणाचा १८०० वर शेतकऱ्यांना लाभ
पणन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी आजवर पन्नास प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. याचा १८०० हून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. कोरोना काळातही प्रशिक्षण बंद होते. पुढील महिन्यापासूनही प्रशिक्षण सुरू होत आहेत. यात परदेशातील शेतीमालाचे ग्रेडेशन कसे ठरविले जाते, शेतीमाल खरेदी-विक्रीचे अन्य देशातील नियम व अटी, कोणत्या दर्जाच्या शेतीमालाला जास्त मागणी असते, मागणी कशी नोंदवावी लागते, पॅकेजिंग व शेतीमाल वाहतुकीचे टप्पे आदी माहिती प्रशिक्षणात दिली जाते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of marketing agricultural products can be exported