तिचा आनंद ओसंडून वाहिला  ; माई! मै गांव को आ रही हूं ! 

Her joy overflowed; My! I am coming to the village!
Her joy overflowed; My! I am coming to the village!
Updated on

कोल्हापूर : माई!, मै गांव को आ रही हूं.... हे बोल आहेत परप्रांतीय महिलेचे. आपल्या आईला गावाकडे येत असल्याचे मोबाईलवरून सांगताना या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता.

लॉकडाउनमुळे गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यात विविध ठिकाणी अडकलेले परप्रांतीय कामगार व त्यांचे कुटुंब असे 218 जण आज 11 बसेसमधून मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशकडे रवाना झाले. 
मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर परप्रांतातून महाराष्ट्रात आलेले लाखो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. प्रशासन आणि विविध सेवाभावी संस्थांकडून मिळालेल्या मदतीवर या कामगारांच्या कुटुंबांनी दीड महिना गुजराण केली. आता शासनाने परप्रांतीयांना गावाकडे जाण्यास परवानगी दिल्यानंतर गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यात वास्तव्याला असलेल्या कामगारांनी ई-पास मिळविला होता. अशा लोकांची तहसील कार्यालयाकडून माहिती संकलित करण्यात आली होती. 
मध्यप्रदेशमधील 76 आणि उत्तर प्रदेशच्या 142 कामगारांना ई-पास मिळाला आहे. आज त्यांच्यासाठी येथील एसटी आगाराच्या प्रमुख सौ. मनगुतकर यांच्या नियंत्रणाखाली 11 बसेस सज्ज ठेवल्या होत्या. 
मध्यप्रदेशच्या लोकांना त्या राज्याच्या बऱ्हाणपूरपर्यंत सोडण्यात येईल. उत्तर प्रदेशसाठी कोल्हापुरातून आज दुपारनंतर रेल्वे होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या कामगारांना कोल्हापूरपर्यंत सोडण्यात आले. या कामगारांच्या चेहऱ्यावर गावाकडे जाताना मोठा आनंद दिसून आला. लहान मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येकजण मोबाईलवरून गावाकडील नातेवाईकांना फोन करीत होते. आज सकाळपासून या कामगारांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, एसटी आगारप्रमुख सौ. मनगुतकर उपस्थित होते. कामगारांच्या एक वेळच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. जनता दल आणि इतरांकडून पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. 


* एसटी सॅनिटायझिंग 
कामगारांना घेऊन जाणाऱ्या एसटी आतून व बाहेरून पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सॅनिटायझिंग करण्यात आल्या. प्रत्येक कामगाराला सॅनिटायझर लावूनच एसटीत प्रवेश दिला जात होता. एका एसटीतून 22 लोकच रवाना झाले. यावेळी प्रांताधिकारी पांगारकर व श्री. पारगे यांनी कामगारांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या विविध सूचना दिल्या. एसटी मध्ये कुठेही थांबणार नसून थेट नियोजित स्थळी जाणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com