अबब... गव्यांचा कळपच घुसला या शहरात ; धावपळीत एका गव्याचा दमछाक होऊन झाला मृत्यू...

A herd of gaur entered the shankeshwar city
A herd of gaur entered the shankeshwar city

संकेश्वर (बेळगाव) - येथे मंगळवारी (ता. २१) बसस्थानकाशेजारी असलेल्या मुस्लीम स्मशानभूमीत चार गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. आधीच कोरोनाच्या धास्तीत असलेले नागरिक गव्यांच्या दर्शनाने भयभयीत झाले आहेत. यंदा प्रथमच गवे शहरात शिरल्याने तारांबळ उडाली. प्रारंभी हे गवे नसून ते म्हैशाना जातीच्या म्हशी असल्याचे समजून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर सदर गवे संरक्षक भींतीवरून उडी मारत असल्याचे पाहून नागरिक भयभयीत झाले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती संकेश्वर पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी संकेश्वर पोलिसांनी भेट देऊन त्या भागातील नागरिकांना सावध केले. वनविभागाच्या कर्मचाऱयांना पाचारण करून गव्यांना हुसकावून लावले. त्यानंतर ते गवे सोलापूर हद्दीत गेल्याचे वनखात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले. शहर वस्तीतून ग्रामीण भागात या गव्यांना हुसकावून लावल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला.

या धावपळीत एका गव्याचा दमछाक होऊन मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील  गडहिंग्लज भागातून आलेले हे गवे हरगापूरगड (वल्लभगड) येथून अंकले, संकेश्वर शहरात प्रवेश केल्याचे समजते. ते अद्याप भागात असून शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
 

लॉक डाऊनमुळे प्राणी-पक्ष्यांचा मुक्तसंचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच वाहने रस्त्यावर नसल्याने वर्दळच नाही. परिणामी प्राणी-पक्ष्यांचा मुक्तपणे संचार सुरू आहे. त्यातूनच संकेश्वर परिसरात गवे आल्याचे स्पष्ट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com