'केसरी' सिनेमाचा हिरो कुठे शिकलाय कुस्ती...?

 Hero of Kesari Cinema Virat Madke has been trained in Kolhapurs Gangavas talim
Hero of Kesari Cinema Virat Madke has been trained in Kolhapurs Gangavas talim

कोल्हापूर - रांगड्या कोल्हापूरची तसेच संपुर्ण महाराष्ट्राची ओळख असणारा कुस्ती हा खेळ.हा खेळ कोल्हापूरच्या तांबड्या मातीत रुजला,या मातीत तयार झालेल्या एका रांगड्या मल्लांची कुस्तीतल्या संघर्षी प्रवासाची कथा केसरी या मराठी सिनेमातुन रुपेरी पडद्यावर शुक्रवारी (ता. २८) ला प्रदर्शित होत आहे. 

नायकाच्या घरात कुस्तीचा वारसा

विशेष म्हणजे मुख्य नायकाच्या भुमिकेत असलेल्या विराट मडके याने चित्रपटासाठी तब्बल चार वर्षे कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या लाल मातीत घाम गाळला आहे. विराट मुळचा कोल्हापुरातल्या कागलवाडीचा आहे.घरात कुस्तीचा वारसा पण त्याने पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि पुण्यात नोकरी करत नाटकां मधुन काम करत होतो.या चित्रपटातुन तो मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. 

कुस्ती हा खुप अंग मेहनतीचा खेळ,कोल्हापूरच्या एका खेडे गावातील सामान्य मुलगा कुस्तीच्या आखाड्यात उतरतो अन् महाराष्ट्र केसरी हा मानाचा सन्मान मिळवण्यासाठी तो इर्षेला पेटतो. यातच त्याच्या कुस्तीच्या वाटेला येणारे राजकारण तसेच आर्थिक, सामाजिक अडथळ्यांचे चित्रण या सिनेमातून पडद्यावर उमटणार आहे.

‘शाळा’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात महेश मांजरेकर कुस्ती वास्तदाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्यासह प्रवीण तरडे, उमेश जगताप, छाया कदम, जयवंत वाडकर, नंदेश उमप यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. 

कोल्हापूर परिसरात चित्रिकरण

या सिनेमाचे चित्रिकरण हे कोल्हापुरातील आखाडे तसेच पन्हाळा, राक्षी, जोतिबा, म्हसाई पठार या ठिकाणी चित्रित झाले. विविध ऋृतु मध्ये तब्बल पंधरा महिने या सिनेमाचे चित्रिकरण या ठिकाणी झालेले आहे.ग्रामिण जीवन त्याच्या जोडीला गावाकडच्या रांगड्या पैलवानाची संघर्ष कथा या चित्रपटातून पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com