
गडहिंग्लज : तालुक्यातील हिरण्यकेशी नदीला दहा दिवसात दुसऱ्यांदा पूर आला आहे. यावर्षी एकूण तीनवेळा या नदीला पूर आला. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी व नांगनूरचा जुना बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दोन दिवसाच्या पावसामुळे हिरण्यकेशी पात्राबाहेर पडून जनजीवनही विस्कळीत झाले. पुरामूळे नदीकाठच्या गावात भितीचे वातावरण आहे.
हिरण्यकेशी नदीला बुधवारी (ता.5) मुसळधार पावसामुळे पूर आला होता. यामुळे नदीवरील भडगाव पूलासह सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने तीन दिवस तालुक्याशी संपर्क तुटला. आता दहा दिवसानंतर पुन्हा एकदा नदी पात्राबाहेर पडल्याने धास्ती वाढली आहे. दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.
सकाळीच ऐनापूर, निलजी, तर दुपारनंतर नांगनूर बंधारा पाण्यामुळे बंद झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. सायंकाळपर्यंत भडगाव पूल आणि जरळी बंधाऱ्यावर पाणी आले नव्हते. परंतु, पाऊस असाच राहिला, तर मध्यरात्री किंवा उद्या सकाळी हे मार्गही वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाची पुन्हा एकदा कसरत सुरू झाली आहे.
गेल्या पुरावेळी स्थलांतरीत झालेली कुटूंबे मूळ घरात स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा एकदा नदीचे पाणी वाढत असल्याने त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येणार आहे. यामुळे प्रशासन पूरावर लक्ष ठेवून असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खबरदारीचा उपाय म्हणून बॅरेकेटींग लावून वाहतूक बंद केली आहे. बंधाऱ्यांवर पाणी आल्याने संबंधित मार्गावरील वाहतूक पार्यायी मार्गाने सुरू झाली आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्याने पूराची धास्ती आणखीनच वाढली आहे. आंबोली, आजरा परिसरातील मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढतच आहे.
"चित्री'तील विसर्ग सुरूच
गडहिंग्लजला वरदायी ठरणारा चित्री प्रकल्प काही दिवसापूर्वीच शंभर टक्के भरला आहे. दरम्यान, या धरणातून 180 क्युसेक्स पाणी वीजगृहासाठी सोडल्याने पाऊस थांबला तरी हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढलेलीच होती. याशिवाय सांडव्यावरून येणारे पाणीही नदीत येत आहे. आता पुरामध्ये या पाण्याचा भर कायम राहणार आहे. परिणामी पूरस्थिती लवकर नियंत्रणात येणार की नाही, याची चिंता आता भेडसावू लागली आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.