
कोल्हापूर : विविध खेळांचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख असून त्यामध्ये हॉकीचाही समावेश आहे. तब्ब्ल 50 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन हे वैशिष्टय. मात्र, जेथे राष्ट्रीय पातळीवरील खेळांचे आयोजन होणे अपेक्षित आहे, असे मैदान काही मर्यादित स्पर्धांपुरतेच मर्यादित राहिले आहे. यातच मैदानाचा विकास आणि मैदानासाठी उपलब्ध उत्पन्नाचे साधन, याकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोल्हापूरच्या हॉकीला मात्र अजूनही ग्राउंडसाठी झगडावे लागत आहे. या स्टेडियमसाठी निधी उपलब्धच्या घोषणा झाल्या. येथे "ऍस्ट्रो टर्फ' होणार हेदेखील निश्चित झाले. मात्र, हे सर्व झाल्यानंतर या मैदानाच्या मेंटेनंन्सचे काय ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
हॉकीसाठी अनेकांनी आयुष्यातील महत्वाचा वेळ खर्ची घातला आहे. याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात शहरातच नाही तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाला आहे. यातूनच अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंची निर्मिती झाली आहे. कोल्हापूरच्या हॉकीने शालेय स्पर्धांमध्ये राज्यातच काय तर देशामध्ये देखील आपला दबदबा कायम राखला आहे. तर 22 शालेय हॉकी संघ, महाविद्यालयीन 15 संघ आणि 18 स्वतंत्र संघ सध्या कोल्हापूरमध्ये अस्तित्वात आहेत. याची व्याप्ती इतकी आहे की आज आजपर्यंत एक हजाराहून अधिक खेळाडूंनी राज्य संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तर 2013 ते 2019 पर्यंत 113 खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
कोल्हापूरमध्ये असणाऱ्या मैदानांमध्ये उत्पनाचे स्रोत म्हणून येथे अनेक गाळे निर्माण करण्यात आले आहेत. नाममात्र शुल्कावर असणाऱ्या या गाळ्यांमधून मिळणाऱ्या उत्त्पन्नातूनच या मैदानाचा मेंटेनन्स केला जातो. असे असूनदेखील या मैदनाबाबत महानगरपालिकेची अनास्था दिसून येत आहे. मैदान तयार झाले तसे काही प्रमाणात जिल्हा, विभागीय व राज्य स्तरीय स्पर्धा झाल्या. मात्र येथील गाळ्यांचे अस्तित्व हे अजूनही "ओपन बार' आहे. परिसरामध्ये आजही तळीरामांचा ठिय्या असतो. शिवाय मैदानाच्या अनेक कोपऱ्यामध्येच काय तर मधोमध देखील दारूच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तसेच उत्कृष्ट मैदान बनवून उत्पन्नाचे साधन वाढविण्याच्या दृष्टीने स्टेडियम विकसित करणे गरजेचे आहे.
गाळ्यांचा विकास करून यातून महानगरपालिकेने आर्थिक उत्पन्न शक्य आहे. आयुक्तच्या विशेष अधिकारातीलटास्कनिधीचा वापर करून हेकाम पूर्ण होऊ शकते शिवाय स्टेडियमचा विकास देखील होऊ शकतो.
- किरण नकाते, नगरसेवक
दृष्टिक्षेप
- हॉकी स्टेडियमवर काही मर्यादित स्पर्धा
- उत्पन्नाच्या साधनांबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष
- शाळा, कॉलेजमधून राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकले
- एक हजारावर खेळांडूंनी मिळवले राज्य संघात स्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.