घरगुती नैसर्गिक एन्जाईम कसं बनवाल ? बगीचा व घरातल्या स्वच्छतेसाठी होतो वापर...

 homemade natural enzymes Used for garden and house cleaning
homemade natural enzymes Used for garden and house cleaning

कोल्हापूर - घरगुती झाडांची, फुलांची वाढ करण्यासाठी घरगुती नैसर्गिक एन्जाईम तयार करता येते. घरातील मळकट बाथरूम व टाईल्सही स्वच्छ करण्यासाठी याचा वापर होतो. केवळ टाकाऊ वस्तूंपासून हे एन्जाईम प्रत्येकाला घरीच तयार करता येते, स्वच्छतेसाठी असलेल्या बाजारातील रसायनाचा वापर न करता नैसर्गिक एन्जाईम तयार केल्यास त्याचा रिझल्ट शंभर टक्के येतो, असा विश्‍वास गृहिणी हर्षदा चव्हाण यांना आहे.

नॅचरल एन्जाईम हे एक नॅचरल पोष्टीक टॉनिक आहे. झाडासाठी त्याचा वापर होता. त्याच्या वापरामुळे नैसर्गिग झाडांची व फुलांची वाढ होते. चांगल्या पद्धतीने मातीचे पोषण होते. गच्छीवरील, अंगणातील झाडांसाठी याचा उपयोग होतो. घरातील स्नानगृह, टाईल्स स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे टाईल्स इतर कोणतेही रासायनिक द्रव न वापरता स्वच्छ करता येते. घरी मुंगी, कीडे, माशा शक्‍यतो होत नाहीत. रासायनिक औषधे वापरण्यापेक्षा हे नैसर्गिक एन्जाईम शंभर टक्के रिझल्ट देते. याचा अनुभव वापरल्यानंतर येतो. त्यामुळे घरातील आजार सुद्धा, व्हायरल इन्फेक्‍शन सुद्धा कमी होण्यास मदत होते.

एन्जाईम घरीच बनवून वापरत आहे. ज्यांना घरी तयार करणे शक्‍य नाही, ते माझ्याकडून विकत घेऊन जातात. मी अनेकांना हे तयार करण्याचे धडे दिले आहेत. हे वापरल्यास रासायनिक द्रव्य वापरावे लागत नाही. गृहिणींसाठी हे एन्जाईम खूप महत्वाचे आहे.
हर्षदा अनिल चव्हाण , गृहिणी, मनिषानगर,वर्षानगरजवळ)

अशी आहे कृती

नॅचरल एन्जाईम बनविण्याची कृती साधी सोपी आहे. घरातील भाज्यांचे वेस्टेज, फळांच्या सालीसाठवून ठेवा. फळांच्या साली किंवा भाज्यांची देठे 300 ग्रॅम घ्या. एक लिटर पाणी घ्या. शंभर ग्रॅम गूळ घ्या. मोठ्या दोन प्लास्टिक बाटलीमध्ये ते मिश्रण भरून ठेवा. भाजी साली किंवा बारीक देठे कापून त्यामध्ये घाला. बाटलीचे बुच एअर जाण्यासाठी दिवसातून एकदा हलके काढावे. तीन महिन्यानंतर बाटलीत एन्जाईम तयार होते.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com