
कोल्हापूर, ः कोरोना सामूहिक संसर्गाची घट्ट मिठी शहरातील विविध भागाला पडत आहे. आज एकाच दिवसात पुन्हा 101 रुग्णांची भर पडली आहे. शनिवार पेठ लोणार गल्लीपाठोपाठ यादवनगर, उमा टॉकीज परिसर, टिंबर मार्केट या परिसराला कोरोनाचा धोका दिसत आहे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने हायरिस्क विभाग म्हणून पाहिले जात आहे.
आता शहरातील गल्लीबोळात कोरोनाची भीती पसरली आहे. उमा टॉकीज परिसरात एकाच कुटुंबातील 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील अन्य कुटुंब सदस्यांना क्वारंटाईन करण्यासाठी नेताना येथे काही काळ वादावादीही झाल्याचे समजते. अखेर संपर्कातील सर्वांनाच प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे.
शहरात कोरोनाबाधितांची परिसरनिहाय संख्या (कंसात आजपर्यंतची संख्या, कंसाबाहेर आजची संख्या) ः राजारामपुरी 3 (आजपर्यंत 61), टिंबर मार्केट 10 (56), जवाहरनगर 5 (39), कसबा बावडा 8 (37), यादवनगर 23 (37), कदमवाडी 5 (34), शनिवार पेठ 27 (33), लाईनबाजार 9 (29), ताराबाई पार्क 2 (29), शाहूपुरी 8 (24), मार्केट यार्ड 2 (23), वारे वसाहत 1 (21), फुलेवाडी 3 (17), रंकाळा टॉवर 9 (17), शिवाजी पेठ 6 (17), विक्रमनगर 7 (17), मंगळवार पेठ 1 (16), नागाळा पार्क 3 (14), शिवाजी उद्यमनगर 7 (13), सानेगुरुजी वसाहत 3 (12), संभाजीनगर 3 (11), हरिओमनगर 7 (9), देवकर पाणंद (8), लक्ष्मीपुरी 5 (8), दसरा चौक 1 (7), सम्राटनगर 2 (7), शिवाजी पार्क 2 (7), टेंबलाईवाडी 4 (7), उत्तरेश्वर पेठ 5 (7), दौलतनगर 5 (6), मोरेमानेनगर 1 (6), शास्त्रीनगर 1 (6), कळंबा 1 (5), शिवाजी चौक 3 (5), एसएससी बोर्ड 2 (5), वायपी पोवारनगर 1 (5), दुधाळी 1 (4), मोरे कॉलनी 4 (4), बुधवार पेठ 1 (3), सर्किट हाउस 1 (3), कनाननगर 1 (3), साळोखेनगर 1 (3), सुतारमळा 3 (3), जरगनगर 2 (2), खरी कॉर्नर 1 (2), विचारेमाळ 1 (2), यशवंतनगर 1 (1).
.....
या भागात सापडले नवे रुग्ण
अंबाई टॅंक, बापट कॅम्प, बापूरामनगर, भक्तीपूजा, बोंद्रेनगर, ब्रह्मपुरी, सायबर चौक, दिलबहार तालीम, गोखले कॉलेज, जामसांडेकर मळा, जिवबा नाना पार्क, कारंडे मळा, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, महाडिक वसाहत, माळी कॉलनी, निंबाळकर माळ, पुईखडी, रायगड कॉलनी, रुक्मिणीनगर, शिवशक्ती कॉलनी.
शहरातील एकूण रुग्णसंख्या : 884
बरे झालेले रुग्ण : 202
शहरातील हॉट स्पॉट व रुग्णसंख्या
1) टिंबर मार्केट वारे वसाहत : 77
2) जवाहरनगर : 39
3) ताराबाई पार्क : 29
......
कंटेन्मेंट झोन
एकूण कंटेन्मेंट झोन : 137
ऍक्टिव्ह झोन : 43
बंद झालेले झोन : 94
.........
बाजारगेट पुन्हा पाच दिवस लॉकडाउन
शहरातील बाजारगेट परिसर पुन्हा पाच दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. प्रभागाच्या नगरसेविका उमा बनछोडे, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, शिवानंद बनछोडे यांनी याबाबत महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.