...अन्‌ खाकी वर्दीही गहिवरली ; त्या मुलीसाठी ठरले देवदूत

Husband and wife and two daughters  burnt and seriously injured in the gas explosion case in kolhapur
Husband and wife and two daughters burnt and seriously injured in the gas explosion case in kolhapur

गडहिंग्लज (कोल्हापूर) : गॅसच्या भडक्‍यात पती-पत्नीसह दोन मुली भाजून गंभीर जखमी झाल्या. पती आणि मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. पत्नीचीही प्रकृती गंभीर आहे. पाच वर्षांची मुलगी ३० टक्के भाजली आहे. पत्नी व मुलगी घरीच आहेत. आर्थिक स्थितीअभावी पुढील उपचाराला अडचण आल्याचे कळताच तपास कामी कुटुंबाच्या घरी गेलेली खाकी वर्दी गहिवरली अन्‌ त्या मुलीला वर्गणी काढून खासगी दवाखान्यात दाखल केले.


गडहिंग्लज पोलिसांनी  दाखवलेली माणुसकी प्रेरणादायी आहे. मांडेकर गल्लीतील दीपक बामणे यांच्या घरी ११ ऑगस्टला गॅसचा भडका उडाला. त्यात स्वत: दीपक, पत्नी संगीता आणि उत्कर्षा व आरती या दोन मुली भाजून जखमी झाल्या. उपचार सुरू असताना दीपक व उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू होते.  

दरम्यान, तपासकामी गडहिंग्लजचे पोलिस बामणे कुटुंबीयांच्या घरी गेले. संगीता व आरती यांची स्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढून आरतीला दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.

दानशूरांनी पुढे यावे....
पैशाअभावी आई आणि मुलीवरील उपचार थांबले होते. मुलीवर पोलिसांच्या पुढाकाराने उपचार सुरू झाले. आई अजूनही घरीच आहे. दानशूरांनी मदत केल्यास आईवरसुद्धा तातडीने उपचार सुरू करता येतील. त्यासाठी दानशूरांनी कुटुंबासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले.

  संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com