इचलकरंजीत पाण्यासाठी टाहो

पंडित कोंडेकर
Saturday, 17 October 2020

कुरुंदवाड-शिरढोण मार्गावर कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू होते. पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे दिवसभर त्या ठिकाणी थांबून होते. एकूण चार ठिकाणी लागलेली गळती काढण्यात येणार असून त्यानंतर कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला जाणार आहे.

इचलकरंजी ः कुरुंदवाड-शिरढोण मार्गावर कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू होते. पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे दिवसभर त्या ठिकाणी थांबून होते. एकूण चार ठिकाणी लागलेली गळती काढण्यात येणार असून त्यानंतर कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला जाणार आहे.

दरम्यान, शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. दोन दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असे सभापती चोपडे यांनी सांगितले. जलवाहिनीला गुरुवारी गळती लागली होती. त्यामुळे उपसा बंद केला. 
सणासुदीच्या दिवसातच गळती लागल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आज दिवसभर एकूण चार ठिकाणी लागलेली गळती काढण्याचे काम सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने गळती काढण्याचे काम आज सांयकाळी पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. अन्य ठिकाणी लागलेली गळतीही काढली आहे. मजरेवाडी उपसा केंद्रानजीक तसेच शिरढोण पंचगंगा नदीजवळ अन्य गळती लागली होती.

पाणी पुरवठा सभापती श्री. चोपडे यांनी आज दिवसभर गळती काढण्याची युद्धपातळीवर मोहीम राबवली. त्यामुळे उद्या (शनिवार) दुपारपासून कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्याच या कांही भागात पाणी पुरवठा होईल. रविवारनंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री.चोपडे यांनी दिली.  

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ichalkaranji city water shorege

Tags
टॉपिकस
Topic Tags: