वीकेंड लॉकडाउनमध्येही वस्त्रनगरीत खडखडाट सुरूच

Ichalkaranji Continues Spinning Even During Weekend Lockdown Kolhapur Marathi News
Ichalkaranji Continues Spinning Even During Weekend Lockdown Kolhapur Marathi News

इचलकरंजी : वीकेंड लॉकडाउनमध्ये शहर पूर्णतः ठप्प होते. यंत्रमाग उद्योगाचा खडखडाट मात्र कायम राहिला. दोन दिवस कापड उत्पादनात कोणताही खंड पडला नाही. त्यामुळे या उद्योगाला दिलासा मिळाला आहे. तसेच, कामगारांनाही आधार मिळाला. 

वीकेंड लॉकडाउनमुळे शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिले. पण, यंत्रमाग उद्योग सुरू राहणार की बंद ठेवावा लागणार, याबाबत सुरवातीला संभ्रमावस्था होती. मात्र, योग्य खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे वीकेंड लॉकडाउनचा कोणताही परिणाम या उद्योगावर झाला नाही. 

शहरातील 24 तास चालणाऱ्या या उद्योगाचा खडखडाट अखंडित सुरू राहिला. कामगारांनाही रोजगार मिळाला. सायझिंग उद्योगही सुरू राहिल्याने सुताची बिमे या उद्योगासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे कापड उत्पादनात खंड पडला नाही. मात्र, उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या. सूत व्यापार बंद राहिल्याने नवीन सूत उपलब्ध झाले नाही. जुन्या साठ्यावरच सध्या तरी हा उद्योग तरला आहे. दुरुस्तीसाठी किरकोळ स्वरूपात यंत्रमाग उद्योग बंद राहिले. दुरुस्तासाठी आवश्‍यक असणारे साहित्य उपलब्ध न झाल्याने असे उद्योग बंद ठेवावे लागले. पण, त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. एकूणच वीकेंड लॉकडाउनचा फारसा परिणाम यंत्रमाग उद्योगावर जाणवला नाही. 

कामगार धास्तावले 
सध्या यंत्रमाग उद्योग सुरू आहे. पण, लॉकडाउनचा कालावधी वाढला तर मात्र या उद्योगावर परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. यंत्रमाग उद्योगाला पूरक आस्थापना बंद राहील. त्यामुळे आठवडाभरानंतर त्याचा परिणाम यंत्रमाग उद्योगावर जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे कामगार वर्ग धास्तावला. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com