स्वयंशिस्त पाळून इचलकरंजी नवा पॅटर्न तयार करेल काय...?

पंडित कोंडेकर
Wednesday, 15 July 2020

कोरोनाचे संकट गडद होत असतानाच शहर उद्यापासून (बुधवार) पूर्ववत होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा शहर लॉकडाउन करण्याची वेळ टाळण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची आवश्‍यकता आहे.

इचलकरंजी : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच शहर उद्यापासून (बुधवार) पूर्ववत होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा शहर लॉकडाउन करण्याची वेळ टाळण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाच संसर्ग थोपविता येणे शक्‍य आहे. यातून नवा इचलकरंजी पॅटर्न तयार होतो.

सुरवातीच्या काळात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे शिथिलता झाल्यानंतर वस्त्रनगरी किमान महिनाभर तरी पूर्वपदावर होती, पण कुडचे मळा येथून समूह संसर्गाला सुरवात झाल्यानंतर मात्र शहरात सुरू झालेला कोरोनाचा कहर आजही सुरूच आहे. रुग्ण संख्या आता कधी कमी येणार, अशी विचारणा प्रत्येकजण करीत आहेत.

संसर्ग रोखण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाउनचा उपायही केला, मात्र कोरोनाचा संसर्ग थांबला नाही. त्यामुळे प्रशासनाने शहर पूर्व पदावर ठेवूनच कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाचा मुकाबला करणे सहज शक्‍य होणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे. यातून कोरोनाला हद्दपार करून धारावी, मालेगाव पॅटर्नप्रमाणे इचकरंजीचा नवा पॅटर्न निर्माण करण्याची जबाबदारी नागरिकांवर आली आहे. 

उद्योगात अधिक दक्षता महत्त्वाची 
शहरात यंत्रमाग उद्योग सर्वत्र विखुरला आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता या उद्योगात आता अधिक खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्‍य आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji Unlocked From Today Kolhapur Marathi News