इचलकरंजीत कोवीड योद्धाच निघाला कोरोनाबाधित

पंडित कोंडेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

येथील पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह त्यांच्या पत्नी बाधित झाल्या आहेत. त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पालिकेतील अन्य अधिकारी व कर्मचारी अशा दहा जणांच्या स्वॅबची तपासणी केली जाणार आहे. शिवाय कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आणखी एका आयजीएम रुग्णालयातील डॉक्‍टराला संसर्ग झाला आहे.

इचलकरंजी ः येथील पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह त्यांच्या पत्नी बाधित झाल्या आहेत. त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पालिकेतील अन्य अधिकारी व कर्मचारी अशा दहा जणांच्या स्वॅबची तपासणी केली जाणार आहे. शिवाय कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आणखी एका आयजीएम रुग्णालयातील डॉक्‍टराला संसर्ग झाला आहे.

दिवसभरात आज 21 रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला. रुग्णांचा आकडा आता 980 वर पोहचला असून 659 इतके ऍक्‍टिव्ह रुग्ण असून 273 जण उपचारानंतर घरी परतले आहेत. एका नगरसेविकेचा पती आज बाधीत झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्‍सिजन पातळीही कमी झाली होती. त्यामुळे स्वॅब दिला होता. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यांने सोलगे मळा परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आयजीएम रुग्णालयातील आणखी एका डॉक्‍टराला संसर्ग झाला आहे. या रुग्णालयाकडील आतापर्यंत तीन डॉक्‍टरांना संसर्ग झाला आहे. याशिवाय कान, नाक, घसा तज्ज्ञ खासगी डॉक्‍टराचाही अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. 
सर्वात धक्कादायक म्हणजे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच संसर्ग झाला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या तीव्र संपर्कातील दहा जणांचे स्वॅब तपासले जाणार आहेत. यापूर्वीही पालिकेच्या एका अधिकाऱ्याला कोरोना संसर्ग झाला होता. अनेक कर्मचारीही बाधित झाले आहेत.

दरम्यान, संसर्गाने आणखी दोघांचा आयजीएम रग्णालयात मृत्यू झाला. यामध्ये शहापूर व मुरदुंडे मळ्यातील वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना ंसंसर्गाने 48 जण दगावले आहेत. 

परिसर व रुग्ण संख्या 
जिव्हेश्‍वर मंदीर शेजारी -1, रेंदाळकर मळा - 3, संभाजी चौक -1, सोलगे मळा -1, डीमार्ट जवळ -1, वीरशैव बॅंकेजवळ -1, 
कामगार चाळ -2, कृष्णानगर -1, इंदिरा कॉलनी -1, इंदिरानगर -1, साळुंखे मळा -1, श्रीपादनगर -1, गणेशनगर -3, बोहरा मार्केट -1, मंगलधामसमोर -1. 

"आयजीएम'मध्ये गोंधळ 
आयजीएम रुग्णालयात आज दुपारी कर्मचाऱ्याच्या हातातून ऑक्‍सिजन सिलिंडर पडल्याने गळती झाली. कोरोना वॉर्डातच ही घटना घडली. त्यामुळे सर्वांची पळापळ झाली. कोरोना रुग्णांसह वैद्यकीय स्टाफने रुग्णालयाबाहेर पळ काढला. त्यामुळे कांही काळ रुग्णालयात गोंधळ उडाला.

 संपादन ः रंगराव हिर्डेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranjit Kovid warrior went to Koronabadhit