हार्मोन्स बदलाचे परिणाम ओळखा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

कोल्हापूर : हार्मोन्स बदलाचे परिणाम ओळखले पाहिजेत. तरुणी, महिलांनी नियमित योगासने केली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. निरूपमा सखदेव यांनी केले. ""हार्मोनल बदल व महिलांचे मानसिक-शारीरिक आरोग्य'' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलता होत्या. कौटुंबिक न्यायालयात महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

कोल्हापूर : हार्मोन्स बदलाचे परिणाम ओळखले पाहिजेत. तरुणी, महिलांनी नियमित योगासने केली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. निरूपमा सखदेव यांनी केले. ""हार्मोनल बदल व महिलांचे मानसिक-शारीरिक आरोग्य'' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलता होत्या. कौटुंबिक न्यायालयात महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

डॉ. निरुपमा सखदेव यांनी सांगितले की, हार्मोन्स बदलामुळे तरुणींच्या शरीरात बदल घडतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही व याची कल्पना घरातील सदस्यांनाही नसते. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल महिलांशी संवाद साधणे खूप महत्वाचे असते. महिलांनी वयाच्या पस्तीशीपासूनच आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित योगासने केली पाहिजेत, जेवणात रोज फलाहार घेतला पाहिजे. महिलांनी आहार, विहार आणि उपचार वेळेत घेतले पाहिजेत. त्यामुळे शुगर, ब्लड प्रेशर, मायर्गेन, थायरॉइड, ऍनिमिया यासारख्या आजारांना पायबंद घालता येईल. 
येथील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. पोंदकुले सांगितले की, महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच घरातील पुरूष सदस्यांनी स्रियांमध्ये हार्मोनल बदलामुळे त्यांच्यात होणारा बदल समजून घेतला पाहिजे. त्यांना होणारा शारीरिक त्रास व त्यामुळे होणारा भावनिक बदल लक्षात घेतला पाहिजे व त्याप्रमाणे त्यांना समजून घेतले पाहिजे. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शुभांगी पत्की यांनी मानले. विवाह समुपदेशक सुवर्णा भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालय वकील संघटना, कोल्हापूरचे उपाध्यक्ष ऍड. संजयकुमार गायकवाड, न्यायालयीन कर्मचारी, वकील वर्ग, महिला पक्षकार उपस्थित होते. 

सर्वच माहिती प्रत्येकास लागू होत नाही 
तसेच गुगल अथवा अन्य माध्यमातून वाचनात आलेली पाहिलेली प्रत्येक माहिती प्रत्येकालाच लागू होते, असे नाही. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच वैद्यकीय उपचार घ्यावेत. आहार घ्यावा असे आवाहन डॉ. सखदेव यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identify the effects of hormone modification