वड्डेबैल येथे सापडल्या 'या' मूर्त्या...

The idols of Goddess Durga and Hanuman were found yesterday at Vaddebail
The idols of Goddess Durga and Hanuman were found yesterday at Vaddebail
Updated on

खानापूर (बेळगाव) - तालुक्यातील वड्डेबैल येथे दुर्गामाता आणि हनुमानाच्या मूर्ती काल शुक्रवारी (ता.25) आढळल्या. मलप्रभा नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरू असून या मूर्त्या पात्रात सापडल्या. जिर्ण झाल्यामुळे कधीकाळी त्या पाण्यात सोडण्यात आल्याचा अंदाज आहे. अद्याप याबाबत पूरातत्व विभागाला माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या कांही दिवसांपासून वड्डेबैलजवळ मलप्रभा नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद असून काल शुक्रवारी कांही तरूण त्याठिकाणी आंघोळीसाठी गेले असतांना त्यांना आधी दुर्गामातेची दगडडी मूर्ती आढळली. त्यांनी सदर मूर्ती गाळातून बाहेर काढली. त्यानंतर त्यांनी आणखी शोध घेतल्यानंतर आणखी दोन मूर्त्या आढळल्या. त्या दोन्ही मूर्ती हणुमानाच्या आहेत. नदीच्या काठावरील एका ठिकाणी या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. सदर मूर्त्या जिर्ण झाल्याच्या कारणास्तव नदी पात्रात सोडल्या गेल्या असाव्यात. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्या वर आल्या असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत तालुका प्रशासनाशी संपर्क साधला असता मूर्त्या सापडल्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले. अधिक माहिती घेऊन पूरातत्व खात्याला कळविले जाईल, असे सांगण्यात आले. स्थानिकांनी मात्र या मूर्त्या पुरातन असल्याची शक्यता वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com