वन्यप्राणी नागरी वस्तीत  आल्यास वन विभागाची लागते कसोटी 

If the wildlife enters the urban area, the forest department has to test it
If the wildlife enters the urban area, the forest department has to test it

कोल्हापूर :  दोन महिन्यांत गवे व तत्सम वन्यप्राणी जंगलाबाहेर येण्याच्या घटना वाढत आहेत. असे वन्यजीव ऊस शेतीतून पुढे येताना वाट चुकून ते नागरी वस्तीकडे आले आहेत. कोल्हापुरात आलेल्या गव्यांच्या कळपाचा समावेश आहे. अशा वन्यजीवांना लोकांच्या गर्दीपासून दूर करीत सुरक्षितपणे जंगल अधिवासात परतवणे हेच वन विभागासमोरील आव्हान आहे. 


हिवाळ्याचा गारठा वाढता आहे. गळित हंगामाची ऊस तोडणी जोरात सुरू आहे. जंगलातील गवेच नव्हे, तर अन्य वन्यजीव बाहेर येत आहेत. जंगलाशेजारील शेतात ऊस, भात पीक मुबलक चारा गव्यांसाठी आहे. त्यामुळे गव्यांचा कळप थेट अवतीभोवतीच्या शेतात जातो. 

ऊस तोडणीनंतर फड रिकामे होत असल्याने गव्यांना पुन्हा जंगलाकडे परतीचा मार्ग सापडत नाही. ते वाट चुकून नागरी वस्तीत येतात. 
हातकणंगले रामलिंग परिसरात बिबट्या आल्याची घटना घडली. याशिवाय जंगली कुत्री, ससे, रानडुकरे यांचाही वावर शेतीत होत आहे. 

गवा आल्याची माहिती मिळताच अनेकदा लोक गर्दी करतात. व्हिडिओ किंवा छायाचित्रे सोशल मीडियावर टाकतात. ज्या भागात गवा आला त्या भागात विनाकारण गर्दी होते. अशी गर्दी, वाहनांचा आवाज, गोंगाट यांची सवय नसलेले गवे अनेकदा शेती सोडून अवतीभोवतीच्या रस्त्यावरून धावत पुढे जातात. त्यांना शेतीकडे किंवा जंगलाकडे जाण्याचा मार्ग सापडत नाही. 
पूर्ण वाढ झालेल्या एका गव्याचे वजन किमान 800 ते 1 हजार किलोपर्यंत असते. बलदंड गवा फार तर एक-दोन किलोमीटरपर्यंत सलग धावतो; पण याच कालावधीत त्याला वेडीवाकडी वळणे किंवा जंगल नसलेल्या रस्त्यावरून धावताना दम लागतो. 
अशी दमछाक होऊन गव्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना वन विभागकडे नोंद आहेत. 
दरम्यान, जंगलातील गवत वाळू लागले आहे. गवे ते खात खात शेजारच्या ऊस शेतीत येतात. तिथून वाट चुकलेला एखादा गवा किंवा त्याचा कळप गावापर्यंत येतो. असेच पन्हाळा, बाजारभोगावमधून वाट चुकलेले गवे पाडळी, शिंगणापूरमार्गे लक्षतीर्थ वसाहतीपर्यंत आले. येत्या काळात गवे या मार्गावर पुन्हा येऊ शकतात. त्याची माहिती वेळीच वन विभागाला देणे वन्यजीवाला जीवदान देण्यासाठी महत्त्वाची आहे. 


""गवा अथवा अन्य कोणताही वन्यप्राणी नागरी वस्तीकडे आल्यानंतर लोकांनी गर्दी करू नये. हे प्राणी गर्दी बघून बिथरतात. ते हल्ला करू शकतात. वन विभाग अशा वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवून असतो. लोकांचे सहकार्य लाभल्यास त्यांना सुरक्षितपणे जंगलाकडे पाठविता येणे शक्‍य होते.'' 
- विजय पाटील, वनपाल, करवीर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com