"ज्याचा माल, त्याचा हमाल' याची  अंमलबजावणी 15 जुलैपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

ज्याचा माल त्याचा हमाल, ज्याचा माल त्याचा विमा, निर्णयाच्या अंमलबजावणीला 15 जुलैपासून सुरवात होणार असल्याची माहिती लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली. या निर्णयामुळे कोल्हापूरसह, सांगली, सातारा, कराड, निपाणी येथील ट्रक वाहतूकदारांची भरणी, हमालीपासून सुटका होणार आहे

कोल्हापूर : ज्याचा माल त्याचा हमाल, ज्याचा माल त्याचा विमा, निर्णयाच्या अंमलबजावणीला 15 जुलैपासून सुरवात होणार असल्याची माहिती लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली. या निर्णयामुळे कोल्हापूरसह, सांगली, सातारा, कराड, निपाणी येथील ट्रक वाहतूकदारांची भरणी, हमालीपासून सुटका होणार आहे. 

ज्याचा माल त्याचा हमाल व विमा याबाबत कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, निपाणी, पेठ नाका, कराड, सातारा येथील वाहतूकदार संघटना, वाहनधारक यांनी न्याय मागणीसाठी संयुक्तपणे लढा दिला आहे. या लढ्याला यश आले असून, या निर्णयाबाबत ट्रक वाहतूकदारांसाठी नियमावली आखण्याबाबतची बैठक कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट लॉरी असोसिएशनच्या कार्यालयात झाली. 

बैठकीत 15 जुलैपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. माल ट्रक वाहतूकदार कोणत्याही प्रकारच्या मालाची भरणी, उतरणी, हमाली देणार नसून निव्वळ भाडे वाहतुकीचा निर्णय झाला. बैठकीत इंधन दरवाढीबाबत शासनाचा निषेध करण्यात आला. 

यावेळी लॉरी असोसिएशन उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानीस प्रकाश केसरकर, विक्रम पाटील, विजय भोसले, शिवाजी चौगले, विजय पोवार, प्रकाश गवळी, रवींद्र चव्हाण, अक्षय पाटील, बाळासाहेब कल्लशेट्टी, राजशेखर सावळे, जयंत सावंत, अल्ताफ सावार, राकेश शहा, मन्सूर बागवान, गणेश रावळ, राजेंद्र दाईंगडे, सचिन जोते, उदय चाकोते, प्रकाश अवसेकर, विजय कडवेकर, प्रकाश भोसले आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implementation of "Whose Goods, His Carriers" from 15th July