शिवसेना खासदारांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचा मोठा नेता उपस्थित; चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक, उद्योग, क्रीडा, 
शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

इचलकरंजी - येथे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आज मंगळवारी माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी या जनसंपर्क कार्यालयात जनतेला आपल्या सर्व समस्या मांडता येणार आहेत. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात येणार आहेत. याशिवाय या कार्यालयाच्या माध्यमातूनजनतेच्या विकास कामाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ यासंदर्भात असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल ,अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

यावेळी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी , भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर , उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे ,माजी पाणी पुरवठा समिती सभापती  विठ्ठल चोपडे, बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, नगरसेवक रविंद्र माने, भाऊसो आवळे, रविंद्र लोहार, 
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या, दिलीप  मुथा, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील, सुभाष मालपाणी, सचिन भुते, अभिजीत पटवा, उदयसिंह निंबाळकर, उमेश पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने यांना प्रत्यक्ष भेटून पुढील जनतेच्या विकासाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

हे पण वाचाVideo - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला? राजू शेट्टी यांनी सांगितले कारण

 

यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक, उद्योग, क्रीडा, 
शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inauguration shiv sena mp dhairyasheel mane office ichalkaranji