esakal | स्वातंत्र्य दिनी असणार हटके डीपी, स्टेटस ; 'ही' ॲप्स आहेत लोकप्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

 Independence day Status popular apps for dp and Status

अलीकडच्या काळात व्हिडिओ स्टेटसचा ट्रेंड वाढतोय, त्यामुळे स्वातंत्र्य दिनासाठी Independence Day Video Status २०२० या ॲपची लोकप्रियता वाढत आहे.

स्वातंत्र्य दिनी असणार हटके डीपी, स्टेटस ; 'ही' ॲप्स आहेत लोकप्रिय

sakal_logo
By
प्रफुल्ल सुतार

कोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट! हा दिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करीत असतो. आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात व्हॉट्‌स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसोबतच असंख्य ॲप्स ही स्वातंत्र्य दिनाविषयी भरभरून व्यक्त होण्याची ‘स्पेशल’ साधने आहेत. सोशल मीडियावर स्टेटसची मोठी क्रेझ आहे. व्हॉट्‌स ॲप, फेसबुकसारख्या साधनांवर सातत्याने वेगवेगळे स्टेटस ठेवले जात असतात. सण, उत्सव असो की एखादा कार्यक्रम; हमखास स्टेटस पाहायला मिळतो. 

हटके शुभेच्छा, हटके ॲप

अलीकडच्या काळात व्हिडिओ स्टेटसचा ट्रेंड वाढतोय, त्यामुळे स्वातंत्र्य दिनासाठी Independence Day Video Status २०२० या ॲपची लोकप्रियता वाढत आहे. यामध्ये आवडती देशभक्तिपर व्हिडिओ गाणी स्टेटसवर ठेवता येतात, तसेच ती डाउनलोड आणि शेअरही करता येतात. एचडी दर्जाची असलेली ही गाणी व्हॉट्‌स ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सहजपणे शेअर करण्याची सुविधा या ॲपवर मिळते. विशेष म्हणजे हे ॲप केवळ ३ एमबी आकाराचे आहे.

स्वातंत्र्य दिनासंबंधीचे निबंध, माहिती आणि कविता हव्या असतील तर Independence Day Speech, Essay, Poems हे ॲप डाउनलोड करता येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त हटके शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी Independence Day Wishes या खास शायरी ॲपचाही पर्याय आहे. देशभक्तीवर आधारित शायरींचा यात समावेश असून या शायरी व्हॉट्‌स ॲप, फेसबुकवर शेअर केल्या जातात.

वाचा - जुनी झाडेच खरे सेलिब्रिटी : अभिनेता सयाजी शिंदे

काहीतरी नवीन तयार करून स्टेटस तसेच शेअर करण्यासाठी Independence Day Frame यातील खास हटके फ्रेम्स लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. नवीन २४ फ्रेम्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये यूजर्सना स्वतःचा फोटो, मजकूर, फॉन्ट, कलर या गोष्टी निवडून आकर्षक अशी थीम तयार करता येते. तसेच ती शेअरही करता येते. स्वातंत्र्य दिनाचे संदेश, ग्रीटिंग्ज आणि ॲनिमेटेड जीआयएफ या सगळ्या गोष्टी Happy Independence Day : Greetings, Quotes, GIF या ॲपमध्ये सामावल्या आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त खास डीपी ठेवण्यासाठी नावाची तिरंगा असलेली अक्षरे हटके ठरू शकतील, त्यासाठी १५ August Stickers for Whatsapp, Independence Day Name Letters हे ॲप आहे. 

अन्य काही ॲप्स -
Independence Day Video Maker, Independence Day GIF २०२०, Independence Day Photo Frames & DP Maker India, Independence Day Shayari Cards, Happy Independence Day Wishes, Independence Day HD Wallpaper २०२०,  Independence Day India HD Wallpaper Pictures

संपादन - मतीन शेख