इंदरगज पर्यटन प्रस्तावाला पर्यटनप्रेमींचा विरोध 

Indergaj tourism proposal opposed by tourism lovers
Indergaj tourism proposal opposed by tourism lovers

कोल्हापूर : इदरगंज पठार राधानगरी अभयारण्याच्या अतीसंवेदशील क्षेत्रात (कोअर झोन) येते. अभयारण्य संवर्धनासाठी बनविलेल्या कायद्यांनुसार या परिसरात कोणताही मानवी हस्तक्षेपास मनाई आहे. कोणत्याही प्रकारचे कृत्रीम बदल करण्यासही मज्जाव आहेत.  असे असुनही वन विभागाने येथे पर्यटनासाठी बनवलेला प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
जिल्ह्यातील सर्व पर्यावरण अभ्यासक, पर्यावरण संवर्धन चळवळीतील कार्यकर्ते, संस्था, संघटनांचा या प्रस्तावाला विरोध आहे. निसर्गातील हा मानवी हस्तक्षेप चुकीचा असल्याचे त्यांचे मत आहे. 
इदरगंज पठार आणि आसपासच्या परिसरात खाण काम सुरू होते. उच्च न्यायालयातील प्रदीर्घ लढ्यानंतर या खाणकामाला उच्च न्यायालयाने मनाई केली. हा भाग राधानगरी अभयारण्याच्या अतीसंवेदनशील क्षेत्रात येतो. या ठिकाणी मानवी हस्तक्षेपाला मनाई आहे. याबाबतचे न्यायलयीन निकालही उपलब्ध आहेत. पठारावर मानवी हस्तक्षेपाला वन विभागानेच विरोध केला होता. प्रा.डॉ.मधुकर बाचुळकर यांनी उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना पठारावरील खाणकामाला मनाई केली. 
आता वनविभागानेच पर्यटन प्रस्ताव बनवावा इदरगंजवर पर्यटनाचा प्रस्ताव बसवणे हा विरोधाभास आहे. येथे अभयारण्यातून जावे लागते. 
हा मार्ग खडतर आहे. त्यामुळे या मार्गात कोणताही कृत्रीम बदल करणे नियमबाह्य आहे. असे असतानाही वन विभागाने येथे कास पठाराच्या धर्तीवर पर्यटन आराखडा बनवला आहे. तो राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे या विषयी प्रशासनाने फेरविचार करावा असे त्यांचे मत आहे. 

दृष्टीक्षेपात इदरगंज पठार 
* एकूण क्षेत्रपळ - 888 हेक्‍टर 
*समूद्र सपाटीपासून उंची - 1200 मिटर 
- चारही बाजूंना तीव्र उताराचे कडे 
- पठाराच्या दोन्ही बाजूस धरणाचे पाणलोटक्षेत्र 

इदरगंज आणि जैवविविधता 
* पठारावर अनेक दुर्मिळ वनस्पती व सरसृप 
* परिसरातून वाघ कोकणातून घाटावर येतात 
* पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने जातात 
* हत्तींचाही वावर परिसरात असतो 
* कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील वन्यजीवांचा येण्या जाण्याचा मार्ग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com