कडेगाव तालुका पुन्हा हादरला : त्या मुलाच्या संपर्कामुळे आणखि तीन कोरोना पॉझिटिव्ह..

infected with ten year old baby corona in family members
infected with ten year old baby corona in family members

कडेगाव (सांगली): भिकवडी खुर्द (ता.कडेगाव) येथील दहा वर्षाच्या कोरोना बाधीत मुलाच्या संपर्कात आलेल्या येथील 14 जणांपैकी त्याचे आजोबा,चुलती व चुलत बहीण असे एकूण 3 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.तर 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी भिकवडी खुर्द येथील 3 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याने येथील कोरोना बाधितांची एकूण संख्या आज चारवर पोहोचली.त्यामुळे कडेगाव तालुका आज पुन्हा हादरला.तर भिकवडी खुर्दसह तालुक्यातील नागरिक आता चांगलेच भीतीच्या छायेखाली आले आहेत.


अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या  महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी येथे आली होती.तर साळसिंगे येथील महिलेला कोरोना झाल्याचे रविवारी  निष्पन्न झाले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन व आरोग्य विभागाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द येथील पती पत्नी व त्यांची दोन मुले असे एकूण चौघांना सोमवारी होम क्वारंनटाईनमधून संस्थात्मक क्वारंनटाईन केले.त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात ठेवले.

अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ​

आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने बुधवारी सकाळी घेतले होते.या चौघांचा कोरोनाचा रिपोर्ट काल शुक्रवारी पहाटे सहा वाजता आला त्यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.तर अन्य तिघांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले होते.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे पुन्हा धाव घेवून या कोरोनाबाधीत मुलाच्या संपर्कात आलेल्या येथील 14 जणांना संस्थात्मक क्वारंनटाईन करुन त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगिकरण कक्षात ठेवले होते.

गावात प्रचंड भीतीचे वातावरण ​

शुक्रवारी  सकाळी त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले होते.त्याचा रिपोर्ट आज रात्री उशीरा प्राप्त झाला.त्यामध्ये 14 पैकी 3 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर 11 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी नव्याने 3 जणांना कोरोना झाल्याने येथील कोरोना बाधितांची संख्या आज चारवर पोहोचली आहे.प्रशासन व आरोग्य विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे.गावांतील पोलीस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे.गावाचे सर्व प्रवेशद्वारे बंद केली आहेत . पोलीस व ग्राम दक्षता समितीने बाहेरुन गावात येणाऱ्या चोरवाटाही बंद केल्या आहेत.तर आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन मोठया प्रमाणात आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात पुन्हा निर्जंतुकीकरण औषध फवारणी सुरु केली आहे. गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com