शाहू कारखान्याचा हा आहे नावीन्यपूर्ण उपक्रम

 This is an innovative venture of Shahu factory
This is an innovative venture of Shahu factory

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सेंद्रीय ऊस शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी 25 टक्के अनुदानावर व्हीएसआय (पुणे) यांचे उत्पादन असलेले वसंत ऊर्जा, सॉईल हेल्थ, प्लांट हेल्थ, बायोपेस्टीसाईड व व्हर्मी कंपोस्ट, मिश्र पेंड, सेंद्रिय खते पुरवण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून पत्रकाद्वारे दिली आहे. 
कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस शेतीमध्ये नवनवीन संकल्पना व वेगवेगळे प्रयोग राबवले. हीच परंपरा आता विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे चालवित आहेत. त्यांनी चारच महिन्यांपूर्वी गुजरातेतील टिंबी येथील सेंद्रीय शेती प्रकल्पास कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट देऊन माहिती घेतली होती. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांमुळे मानवी आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे विषमुक्त शेतीसाठी यापुढे सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. हे ओळखून त्यांनी शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. 
उपक्रमांतर्गत लागण हंगाम 2020-21 मध्ये लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती योजना अंतर्गत वरील सेंद्रिय खताच्या रकमेवर 25 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे व उर्वरित संपूर्ण रक्कम बिनव्याजी उधारीवर देण्याचेही जाहीर केले आहे. तसेच पुढील गळीत हंगामात सेंद्रीय ऊस शेती योजनेतून लागवड केलेल्या ऊस प्लॉटमधील संपूर्ण ऊस एकाच वेळी गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणण्याचे नियोजन आहे. 

25 टक्के अनुदानावर सेंद्रिय ऊस शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नजीकच्या सेंटर ऑफिसकडे नावे नोंदवावीत व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. 
- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com