कोल्हापुरातील शेतकऱ्यांना आता मिळणार बिनव्याजी 3 लाखांपर्यंतचे पीककर्ज

सुनील पाटील 
Sunday, 27 December 2020


ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ : कर्जमाफीतील व्याज आकारणी बंद 

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी दिले जाते. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आज केली. 5 फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मंजूरी घेतली जाणार असल्याचेही  मुश्रीफ यांनी सांगितले. 

कर्जमाफी रद्द झाल्यानंतर अनिष्ठ दुराव्यात म्हणजे ज्या संस्थांकडून सुरु असलेली व्याज वसूल बंद केली जाणार आहे. तसेच, आकारलेले व्याज परतही दिले जाणार असल्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली. कोल्हापूर जिल्हा सहकारी (केडीसीसी) मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ई-लॉबीसह युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम व मोबाईल व्हॅन अनावरण व नूतन इमारत भूमीपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून 18 ते 20 कोटी रुपये कर (इन्कम टॅक्‍स) भरतो. यावर्षीही नफा वाढल्यामुळे येवढाच कर भरावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा बॅंकेचा व्यवसाय कमी होईल, अशी भिती होती. पण डिसेंबरनंतर चांगले चित्र आहे. शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देत होतो. 3 लाखापर्यंतचे कर्ज 2 टक्के व्याज दराने देत होतो.

तर शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंतच पीककर्ज बिनव्याजी द्यावे, असा प्रस्ताव बोर्डासमोर आणला जाईल. 5 फेब्रुवारीला बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाईल. 1 एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याज दिले जाईल. शेतकऱ्यांसाठी काही तरी करावे अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांची असते. त्यांच्या मागणीनूसारच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या कर्जमाफातील 110 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली होती. यावर संस्थांकडून व्याजही घेतले. यामुळे संस्था आतबट्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या सर्व संस्थांकडून सुरु असलेली व्याज आता थांबवले जाणार आहे. तसेच, जे काही व्याज वसूली झाली. ते व्याज ही परत देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे संस्थांसाठी ही बाब दिलासादायक आहे. अपात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द केली. त्यानीं 112 कोटी रुपये भरत घेतले होती. त्यामुळे या सहकारी संस्था यावरील व्याज भरुन घाईला आल्या आहेत.

वास्तविक आम्ही आमच्या बॅंकेचे पैसे वसूल करत होतो. 15 टेक्‍क व्याज होते. यामध्ये येवढे मोठे व्याज भरुन संस्था अनिष्ठ दुराव्यात सापडल्या होत्या. या सर्व संस्थांची व्याज आकरणी थांबवली आहे. सुप्रिम कोर्टानेही दहा लाखांपर्यंत कर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यावर निर्णय होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे वसूल केलेले पैसे व्याजासह परत देण्याच्या सूचना दिल्या आहे. आम्ही ते पैसे संस्थांना व्याजासह परत देण्याची ग्वाहीही श्री मुश्रीफ यांनी दिली. 

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेच्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले पाहिजे. बॅंकेने खूप मोठी झेप घेतली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. सर्व सामान्यांनाही याचा लाभ झाला पाहिजे. यासाठी नेहमीच जिल्हा बॅंके आघाडीवर आहे. यावेळी, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. बी. माने, प्रशासकीय व्यवस्थाप जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interest free peak loans of up to Rs 3 lakh to farmers in Kolhapur district information for hasan mushrif