शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखती पूर्ण ; आज होणार निवड

Interviews of the Vice Chancellor of Shivaji University completed
Interviews of the Vice Chancellor of Shivaji University completed

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेचा अंतिम टप्पा आज पूर्ण झाला. यामध्ये कुलपतींनी आज अंतिम यादीमधील पाचही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उद्या (ता. ६) कुलगुरुपदी एका उमेदवाराची निवड केली जाईल, अशी माहिती कुलपती कार्यालयाकडून देण्यात आली.

विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. १६९ अर्जांच्या छाननीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आज पार पडला. संध्याकाळी कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. नितीन देसाई, डॉ. कारभारी काळे, डॉ. अविनाश कुंभार आणि डॉ. अंजली कुरणे यांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. प्रत्येक उमेदवाराला १५ ते २० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. उद्या (ता. ६) दुपारपर्यंत अधिकृत नावाची घोषणा होईल, असे कुलपती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अंतिम पाच उमेदवारांचा अल्पपरिचय.


प्रभारी कुलगुरू म्हणून काम
डॉ. कारभारी काळे औरंगाबाद जिल्ह्यातील. सालुखेडा हे काळे यांचे मूळ गाव आहे. त्यांनी इंजिनिअरींग टेक्‍नॉलॉजीमध्ये एमएस्सी पीएच.डी. केली असून सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

२८ वर्षांचा अनुभव
डॉ. नितीन देसाई यांचे गडहिंग्लज तालुक्‍यातील तळेवाडी हे मूळ गाव आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एमस्सी, पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले असून सध्या ते मुंबईमधील नरसी मोनजी इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विज्ञान शाखेचे आधिष्ठाता आहेत. 

केंद्राचे संचालक
डॉ. अविनाश कुंभार मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे आहेत. त्यांनी रसायनशास्त्रात एम.एस्सी, पीएच.डी. केली आहे. सध्या ते पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते पूर्वी रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. अद्ययावत उपकरण केंद्राचे संचालक होते. 

कुलसचिव म्हणून काम
डॉ. दिगंबर शिर्के यांचे मूळ गाव हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फ वडगाव आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विभागात एमएस्सी, एम.फील, पीएच.डी. केली आहे. विभागप्रमुख, कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदावर त्यांनी काम केले असून त्यांना शिक्षण क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव आहे.

पुणे विद्यापीठात कार्यरत
डॉ. अंजली कुरणे येथील शिवाजी पेठेतील असून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानवशास्त्र शाखेच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्राणिशास्त्र विषयात बी.एस्सी. केले असून मानवशास्त्र विषयात एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com