आयर्नमॅन किताबाची संधी यंदा हुकणार ; कोल्हापुरातील खेळाडूत निराशा 

सुयोग घाटगे
Monday, 23 November 2020

यंदाच्या आयर्नमॅनसारख्या किताबासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. सर्वाधिक आयर्नमॅन कोल्हापुरात आहेत. यंदा यात आणखी किमान 12 जणांची भर पडली असती, मात्र ही संधी हुकणार आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सात महिन्यांपासून बंद असल्याचा फटका विविध स्पर्धांवर झाला. यंदाच्या आयर्नमॅनसारख्या किताबासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. सर्वाधिक आयर्नमॅन कोल्हापुरात आहेत. यंदा यात आणखी किमान 12 जणांची भर पडली असती, मात्र ही संधी हुकणार आहे. सध्या 22 जण यासाठी तयारी करत आहेत. सध्या 19 वर्षांपासून 50 वर्षांपर्यंतच्या आयर्नमॅन स्पर्धक कोल्हापुरात आहेत. 

स्विम, रन, राईड या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या या स्पर्धेचे जगभरात हजारो स्पर्धक आहेत. कोल्हापुरातूनही अनेक स्पर्धक जगभरातील विविध देशांत जातात. साधारण जुलै ते डिसेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या या स्पर्धा मात्र होऊ शकल्या नाहीत. यामुळे देशातील सर्वाधिक आयर्नमॅन असणाऱ्या जिल्ह्याला यंदा आयर्नमॅन किताब मिळणार नाही आहे. 40 वर्षांपूर्वी अमेरिकेतील हवाईकोना येथे निव्वळ 10 लोकांच्या सहभागाचा स्पर्धेने याची सुरवात झाली. यानंतर याचे जगभरात प्रसार होऊ लागला. सर्वात कठीण असणाऱ्या क्रीडा प्रकारापैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. ट्रायलॉन प्रकारात मोडणारी ही स्पर्धा आहे. जिल्ह्यतील 32 जणांनी आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे. 

कोल्हापूरच्या 31 जणांना किताब 
2014 साली कोल्हापूरच्या चौघांनी हा किताब पटकावला. या नंतर 2015 ला यात आणखी भर पडली. 2016 ला यात खंड पडला. 2017 ते 19 दरम्यान जिल्ह्यातील ही संख्या 32 झाली आहे. 

काय आहे ही स्पर्धा 
*स्प्रीट ट्रायलॉन ही आयर्नमॅन साठीची पहिली स्पर्धा 
* हाफ आयर्नमॅनमध्ये : 2 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग, 21 किमी धावणे हे 9 तासात पूर्ण करावे लागते. 
फूल आयर्न मॅन : 4 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग, 42 किमी धावणे हे 17 तासांत पूर्ण करायचे असते. 

आयर्नमॅन किताब मिळवणे हे ध्येय बाळगून अनेक जण तयारी करत आहेत. यंदाच्या वर्षी स्पर्धा झाली नसली तरीही येणाऱ्या स्पर्धांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. 
- वैभव बेळगावकर, आयर्नमॅन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ironman book opportunity will be missed this year; Disappointment in Kolhapur players

टॉपिकस
Topic Tags: