'चंदगड'च्या आरोग्याचा प्रश्न सरपंच संघटनेच्या अजेंड्यावर...

The issue of health of Chandgad taluka is on the agenda of Sarpanch organization
The issue of health of Chandgad taluka is on the agenda of Sarpanch organization
Updated on

चंदगड - ढेकोळी (ता. चंदगड) येथील सरपंच नरसिंग पाटील यांनी तालुक्यात उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवेसाठी सरपंच संघटनेमार्फत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प मांडला. संघटनेच्या व्हाट्सअप ग्रुप वर त्यांनी ही संकल्पना मांडली आणि तालुक्यातील सर्वच सरपंचांनी त्याला प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर सुद्धा या विषयावर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरपंच संघटनेचे स्वागत करून आपली मते मांडली.

यानिमित्ताने चंदगडच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कोकण आणि कर्नाटक सीमेवरील हा तालुका निसर्गसंपन्न आणि शेती उत्पादनात सुद्धा अग्रस्थान आहे. परंतु जिल्ह्याच्या आणि राज्याच्या एका टोकाला असलेल्या या तालुक्याकडे शासनस्तरावरून नेहमी दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव सारखे मोठे शहर जवळ असल्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होत असली तरी अत्यावश्यक काळात मात्र कर्नाटकातील हे शहर असो किंवा गडहिंग्लज, कोल्हापूर, पुणे, मुंबई सारखी शहरे उपयुक्त ठरत नाहीत. दूरचे अंतर असल्यामुळे रुग्णाला दवाखान्यात नेई पर्यंत तो दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्याच आठवड्यात कागणी येथील शेतकऱ्याला सर्पदंश झाला. बेळगाव शहरापासून वीस किलोमीटरवर असलेल्या या गावातील रुग्णावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. लॉक डाऊनमुळे कर्नाटक सीमा बंद केल्याने या रुग्णाला बेळगावकडे नेता आले नाही. गडहिंग्लज येथे रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे तालुक्यात उत्तम आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा किती उपयुक्त आहे हे पुन्हा एकदा चर्चेत आले.

सरपंच संघटनेने शासनाकडून मिळणाऱ्या वित्त आयोगातील ठराविक रक्कम आरोग्यसेवेसाठी म्हणून रुग्णालयाला दिल्यास दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो असा विचार मांडला आणि या विषयाची कोंडी फोडली. सातवणे चे सरपंच रामभाऊ पारसे यांनी स्वतःची दोन एकर जमीन रुग्णालयासाठी देणगी देण्याचे जाहीर केले. अर्थात शासनाचे नियम आणि अटी पाहता त्याला कितपत यश येईल याबाबत शंका असली तरी हा निर्णय स्वागतार्ह आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. दीडशे गावं आणि सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल नाही. बेळगाव- वेंगुर्ला हा दोन राज्यांना जोडणारा मार्ग या तालुक्यातून जातो. या मार्गावर सतत अपघात होत असतात. आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी जवळ हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. याशिवाय रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार यासारख्या रोगावर उपचार करण्यासाठी सुसज्ज आणि उच्च दर्जाच्या हॉस्पिटलची गरज आहे. पाटणे फाटा येथे पन्नास खाटांचे ट्रामा केअर सेंटर मंजुर आहे. ते लवकरात लवकर अस्तित्वात यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com