आयटी क्षेत्रातील तरूण रमले वन शेतीत; पडीक, दगडधोंडे व उताराच्या जमीनीत लावली 800 झाडे....वाचा सविस्तर बातमी

IT Youngsters 800 Trees Planted In Fallow, Rocky And Sloping Lands Kolhapur Marathi News
IT Youngsters 800 Trees Planted In Fallow, Rocky And Sloping Lands Kolhapur Marathi News

उत्तूर : बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील सुशांत शिवाजी केसरकर व अभिजित मधुकर केसरकर या युवकांनी आपल्या जमिनीत 800 झाडे लावली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग त्यांनी वन शेतीसाठी केला. 

केसरकर यांची गावाशेजारी पडीक जमीन आहे. याठिकाणी मोठे दगडधोंडे व उतार असल्याने पिक घेता येत नव्हते. अभिजित व सुशांत पुणे येथे आयटी क्षेत्रात काम करतात. लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या गावी आले आहेत. या काळात रिकामे राहण्यापेक्षा शेतीत काही तरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागासी संपर्क साधल्यावर त्यांना वन शेतीची माहिती मिळाली.

या योजनेअंतर्गत त्यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता होईल, अशा ठिकाणी 25 गुंठे क्षेत्र त्यांनी निवडले. याठिकाणी त्यांनी शेवगा (770) काजू (30), अंजीर (5) नारळ (2) आंबा (2) ही झाडे लावली. ज्या ठिकाणची झाडे जगली नाहीत त्या ठिकाणी पुन्हा रोपे लावली. झाडांची चांगली देखभाल केल्याने व सेंद्रिय खत दिल्याने 100 टक्के झाडे जगली आहेत.

उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला आहे. शेवगा लावणीसाठी ओडीसी प्लेन या जातीची निवड केली आहे. यासाठी त्यांना 60 हजार रुपये खर्च आला आहे. शेवग्याचे झाड लावल्यापासून सहा महिन्यांनी उत्पादनाला सुरवात होईल. 

लॉकडाऊनचा उपयोग वृक्षलागवडीसाठी
वनशेतीसाठी शासनाने 2018 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करतात त्यांना शासन अनुदान देणार आहे. केसरकर बंधूनी लॉकडाऊनचा उपयोग वृक्षलागवडीसाठी केला हे कौतुकास्पद आहे. 
- किरण उगले, कृषी सहाय्यक 

ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत
केसरकर यांनी ठिबक सिंचनसाठी कंपनीसी संकर्क साधला. जमीन चढ उताराची असल्याने कंपनीच्या सल्यानुसार त्यींनी ठिबक सिंचन बसवले. यामुळे पाण्याची बचत झाली व रोपांची वाढ चांगली झाली. 
- सागर तारळेकर, चिमणे 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com