Jaisingpur is a safe city in all respects
Jaisingpur is a safe city in all respects

जयसिंगपूर सर्वच दृष्टीने सुरक्षित शहर 

Published on

जयसिंगपूर : सर्वच दृष्टीने जयसिंगपूर हे सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. सीसीटीव्ही प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी मंजूर करुन येत्या चार महिन्यात हे काम मार्गी लावण्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यांतर्गत उदगाव टोल नाक्‍यावर चेकपोस्ट नाक्‍याच्या प्रारंभप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. मिरजेत जातीय दंगल उसळली असतानाही जयसिंगपूर शहरात मात्र बारापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहात होते ही शहराची खासीयत आहे. शहरात गुन्ह्यांचे प्रमाणही अल्प आहे, असे ते म्हणाले. 

जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख म्हणाले,""जयसिंगपूर शहरातील दानशूरांकडून कोणत्याही चांगल्या उपक्रमाला भरभरुन मदत दिली जाते. एक आदर्श शहर म्हणून जयसिंगपूरकडे पाहतो. शहर अधिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिसांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्हीचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाला मंजूरी मिळण्याची गरज आहे. अनेक चांगल्या उपक्रमाची सुरुवात याच शहरातून होते ही बाब अभिमानाची आहे. सामाजिक भावनेतून वजीर रेस्क्‍यू फोर्सच्या कार्यकर्त्यांनी तीन महिन्यापासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उदगाव नाक्‍यावर साथ दिली आहे. त्यांनाही पोलिस आणि लोकवर्गणीतून आर्थिक मदत दिली जात आहे. रेस्क्‍यु फोर्सच्या कार्यकर्त्यांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे.'' 

जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी चेकपोस्टसाठी दानशूरांनी मदत केली असून त्यांचे आभार मानले. सौ. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्षा डॉ. निता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, उद्योगपती विनोद घोडावत, विनोद चोरडिया, राजेश सानिकोप, कनकभाई शहा, ऍड. संभाजीराजे नाईक, राकेश खोंद्रे, सुरज भोसले आदी उपस्थित होते. 

मंत्री पाटील-यड्रावकर म्हणाले... 
- सीसीटीव्ही प्रकल्पाचे चार महिन्यात काम पूर्ण 
- शहरात गुन्ह्यांचे प्रमाण अल्प 
- मिरजेतील दंगलीवेळीही जयसिंगपुरात शांतता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com