कोल्हापुरच्या तरुणीचे कौशल्य ; टाकाऊ चिंध्यांपासून बनवली फॅब्रिक ज्वेलरी

jewellery made by a kolhapur girl with the help of not used cotton at home in kolhapur
jewellery made by a kolhapur girl with the help of not used cotton at home in kolhapur

कोल्हापूर :  काही महिने कधी न पाहिलेल्या लॉकडाउन आणि कोरोनाच्या काळात नवनवीन अनुभव घेत लॉकडाउनमध्ये मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कलाकारांनी सृजनशीलतेची साधना केली, त्यातून अनेक कलाकृती आकारास आल्या. त्याच सृजनात्मकतेला जाणून औरंगाबाद येथे अभिजात कलेचे शिक्षण घेणारी उत्तूर (ता. आजरा) येथील प्रतीक्षा व्हनबट्टेने कला कौशल्यमिश्रित ‘फॅब्रिक ज्वेलरी’ या संकल्पनेला आकार दिला आहे.

सभोवताली असणाऱ्या वस्तूंकडे नव्या दृष्टीने पाहिल्यामुळे ही संकल्पना चांगली व इतरांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विचार प्रतीक्षाच्या मनात आला. तिची आई शिवणकाम करते. कापडाचे विविधरंगी तुकडे टाकाऊ असतात. चिंध्या म्हणून त्या टाकून दिल्या जातात मात्र त्या न टाकता या तुकड्यांचा कलात्मक उपयोग करत तो प्रत्यक्षात कपड्यातील ज्वेलरीत उतरला आणि त्यातूनच ‘फॅब्रिक ज्वेलरी’ साकारली.

छंद आणि क्रिएटिव्हिटी यांची सांगड घालून तयार झालेली ही कलाकृती म्हणजे जुन्या परंपरेला उजाळा देणारा ठरली आहे. या टाकाऊ कपड्यांतून दुर्मिळ नाणी, पारंपरिक वस्त्र, चित्रकलेतील वेगवेगळ्या चित्रशैली, पूरक रंगसंगती प्रेरित झाली आहे. पर्स, नेकलेस, गळ्यातील कलात्मक माळ, लॉकेट अशा ज्वेलरीच्या विविध वस्तू बनविल्या आहेत.

"मार्केटमध्ये जुन्या रीती परंपरा किंवा वस्तू नव्या पद्धतीने नव्या ढंगात वापरण्याचा ट्रेड सुरू आहे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनही ज्वेलरी मी बनवली आहे. त्यात हॅन्डमेड नेकलेस आणि क्‍लच पर्स असून भविष्यात वैविध्य जपणाऱ्या कलाकृती तयार करण्याचा मानस आहे."

- प्रतीक्षा व्हनबट्टे, उत्तूर

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com