
रात्री साडेअकराच्या सुमारास पूजा एकनाथ वरुटे व तिची सासू बेबीताई वरुटे टीव्ही पाहत होत्या.
मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे सोन्याचे साडेसहा तोळ्याचे दागिने पळविले. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हमिदवाडा (ता. कागल) येथील माळवाडी येथील घरात सोमवारी (ता. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास पूजा एकनाथ वरुटे व तिची सासू बेबीताई वरुटे टीव्ही पाहत होत्या. यावेळी अनोळखीने पूजा यांचे पती एकनाथ यांच्या नावाने हाक मारली. कोण आहे हे पाहण्यासाठी पूजाने दार उघडताच अनोळखीने चाकूचा धाक दाखवून दागिने काढून द्यायला सांगितले. त्याचवेळी अनोळखीने सासू बेबीताई यांचे तोंड दाबून धरले. झटापटीत बेबीताईंच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला जखम झाली. त्या व्यक्तींने सोने द्या नाहीतर चाकू पोटात खुपसणार अशी भीती घातली. तसेच मुलगा कामावरुन घरी येत असताना त्याला वाटेतच मारणार असे धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या बेबीताई व पूजाने सोन्याचे अडीच तोळे वजनाचे 1 लाख 25 हजारांचे गंठण, काळे मणी असलेले दीडतोळे वजनाचे 75 हजार रुपयांचे मणीमंगळसूत्र, दोन तोळे वजनाचा एक लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस व 25 हजार रुपयांची कानातील सोन्याची अर्धा तोळे वजनाची दोन कर्नफुले असा एकूण 3 लाख 25 हजार रुपयांचे ऐवज हातोहात लंपास केला.
हे पण वाचा - मुर्दाड सरकारला जागं करण्यासाठी स्वाभिमानीचा जागर
बाहेर जाताना दरवाजाला बाहेरील बाजूने कडी लावली. तेथून पळ काढला. याबातची फिर्याद पूजा वरुटे यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे