जोतिबा देवाची श्रीकृष्ण रुपातील महापूजा ; उद्या होणार दिवे ओवाळणी   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jotiba Mahapuja in form of Lord Krishna

आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीत धूपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.

जोतिबा देवाची श्रीकृष्ण रुपातील महापूजा ; उद्या होणार दिवे ओवाळणी  

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता.पन्हाळा ) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील आठव्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण रुपातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली. उद्या पहाटे मंदिरात डोंगरावरील महिला पारंपारीक पध्दतीनूसार दिवे ओवाळणी करतील .
 
जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास मोठे पारंपरिक महत्त्व असून याठिकाणी नवरात्र उत्सव दिमाखात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे हा सण साध्या पद्धतीने साजरा केला जातोय.

आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीत धूपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.

यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते. सकाळी दहा वाजता हा सोहळा ज्योतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी  प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली आणि या सोहळ्याची सांगता झाली. 

हे पण वाचा - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर व परिसरात आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पाहताना मन प्रसन्न होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top