esakal | करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Worship of Ambabai as Mahishasurmardini

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज रात्री देवीचा जागर होणार असून रात्री साडेनऊ वाजता देवी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर देवीचे वाहन असेल. महाद्वार चौक, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरु महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वार चौकातून मंदिर असा नगर प्रदक्षिणेचा मार्ग राहील.

हे पण वाचा 15 गुंठ्यात पिकवले 34 पोती भात  ; सडोलीतील शेतकऱ्याचा प्रयोग 

दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर यंदा भाविकांना दर्शनासाठी बंद आहे आणि उत्सव काळातील सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले असले तरी काही भाविकांनी अनोख्या पध्दतीने यंदा सेवा दिली आहे. अमरावतीचे संगीतकार संकेत जोशी प्रत्येक वर्षी मंदिरात संगीत सेवा देतात. यंदा मंदिरात येता आले नसले तरी त्यांनी आज खास अष्टमीच्या निमित्ताने "हे अंबिके जगदंबिके' हे गीत "यू ट्यूब'वरून प्रसारित केले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे