कोल्हापुरच्या 'या' कब्बडीपटूंनी कौशल्याच्या जोरावर मिळवल्या नोकऱ्या...

kabbadi players of Kolhapur occupants gain jobs on the basis of skill
kabbadi players of Kolhapur occupants gain jobs on the basis of skill
Updated on

कोल्हापूर - कबड्डीतील कौशल्याच्या जोरावर कबड्डीपटूंना नोकऱ्या मिळाल्या. प्रा. डॉ. रमेश भेंडिगिरी व बाळू पुजारी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, तर विष्णू गावडे युनियन बॅंकेत चिकटले. विलास खानविलकर यांनी बी. पीएड. केल्यावर क्रीडाशिक्षक म्हणून रुजू झाले. वीरसेन पाटील शारीरिक शिक्षण संचालक, तानाजी मुरवणे आणि प्रकाश पाटील पोलिस भरती झाले. वडणगेतील शिवाजी देवणे क्रीडाशिक्षक झाले, तर नंदू देवणे, विकास अस्वले, कृष्णा शेलार यांची एक्‍साईजमध्ये स्पोर्टस्‌ कोट्यातून वर्णी लागली. कबड्डीपटूंनी मैदानावर गाळलेल्या घामाचे चीज झाले. खेळातून करियरचा मार्ग सोपा होतो, याची पक्की समजूत उदयोन्मुख खेळाडूंच्या मनावर ठसली. 

 १९९०-९१ पर्यंत जिल्ह्यात कबड्डीचा प्रसार होत राहिला

जिल्ह्यातील कबड्डीची १९७८ ते १९९०  दरम्यानची स्थिती लक्षात घेतली तर कोल्हापूरच्या संघाची पुरुष गटात राज्य चाचणी स्पर्धेत सहभागी होणे तितकेच ध्येय असायचे. सातारा, पुणे, मुंबई चे राज्य चाचणी अजिंक्‍यपद स्पर्धेत मक्तेदारी होती. शिवाजी विद्यापीठाच्या संघात कोल्हापूरचे एक दोनच खेळाडू असायचे. याउलट कुमार गटाचा संघ राज्य अजिंक्‍य स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकात बाजी मारायचा. प्रा. संभाजी पाटील यांनी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महाविद्यालय खेळाडूंना एकत्र करण्याचे काम याच काळात केले. कबड्डीचा १९९०-९१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात प्रसार होत राहिला. डॉ. भेंडिगिरी एक वर्षाचा एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करून परतले. त्यानंतर कोल्हापूरच्या कबड्डीचा परफार्मन्स उंचावत गेला. साखळीत गारद होणारे कोल्हापूरचे संघ उपांत्य पूर्व, उपांत्य फेरीत धडक देऊ लागले. याच दरम्यान प्रा. संभाजी पाटील यांच्याकडे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सचिव पदाची सूत्रे आली. प्रशिक्षक म्हणून डॉ. भेंडिगिरी यांनी सरावात ढिलाई केली नाही.

कोल्हापूर जिल्हा मुले व मुलींचा संघ ज्युनियर व सब ज्युनिअरच्या अंतिम फेरीत पोचला. ग्रामीण भागातील कबड्डीला चालना मिळाली. गावोगावच्या जत्रांत कबड्डीच्या स्पर्धांत इर्षेला धग मिळाली. कोल्हापूर शहरसह इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड, किणी, तळसंदे, कोडोली, वडणगे, शिरोली पुलाची इथल्या संघांत चषक पटकावण्याच्या चढाओढीने इर्षेचे टोक गाठले. पुण्यातील राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत कोल्हापूरचा संघ सातारा संघाकडून पराभूत झाला असला तरी कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. प्रा. संभाजी पाटील, विलास पाटील, विलास खानविलकर, गोविंद घाटगे, उमेश चोरगे, विलास उगळे, भगवान पवार, पद्माकर गोसावी, जगनाथ चौगुले, बी. एच. पाटील मैदानात उतरल्यावर त्यांना मैदान अपुरे पडायचे, असे कबड्डीतील जाणकार सांगतात. या खेळाडूंनी १९८० ते ८५ दरम्यान कबड्डीला पोषक वातावरण तयार केले. बाबूराव परितेकर यांनी व्यवस्थापक म्हणून उत्तम काम केले.

जिल्ह्यातील जुने संघ असे...

 जयहिंद क्रीडा मंडळ (कल्लाप्पा आवाडे, इचलकरंजी)
 बाल शिवाजी क्रीडा मंडळ (अण्णासाहेब गावडे, शिरोळ)
 साधना क्रीडा मंडळ (आब्बास पाथरवट, कुरुंदवाड),- सह्याद्री क्रीडा मंडळ (प्रा. संभाजी पाटील, कोल्हापूर)
 किणी विद्यार्थी मंडळ (नेमगोंडा पाटील, एस. के. माळी, किणी)
 वारणा खोरा (विलास पाटील, भगवान पवार, कोडोली)
 जय किसान क्रीडा मंडळ (बी. एच. पाटील, वडणगे), 
 नवभारत क्रीडा मंडळ (शिरोली पुलाची, गोविंद घाटगे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com