कळंबा मध्यवर्ती कारागृहात  बंदीवर खिळ्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांक दाखवून बरॅक क्रमांक चारकडे जाणाऱ्या जिन्याजवळ बोलवून घेतले.

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात खिळ्याने झालेल्या हल्ल्यात बंदी जखमी झाला. आज सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी दोघा संशयित बंदींवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मेहुल संदीप पाटील व विराज विजयकुमार गरूड अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मकरंद ऊर्फ मारुती बाबासाहेब मोटे (वय ४६, रा. खंडाळा, सातारा) व संशयित मेहुल पाटील व विराज गरूड एकाच बरॅकमध्ये आहेत. सकाळी मकरंद झोपून उठला. त्यावेळी त्याला मेहुल व विराजने बरॅकच्या बाहेर बोलावले. त्याला व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांक दाखवून बरॅक क्रमांक चारकडे जाणाऱ्या जिन्याजवळ बोलवून घेतले.

हेही वाचा- इचलकरंजी आगार जिल्ह्यात अव्वल -

त्यानंतर त्याला पाठीमागून धरून त्याच्यावर लोखंडी खिळ्याने हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबत मकरंदने दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुल व विराज या दोघांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalamba central jail crime case in kolhapur