esakal | महाराष्ट्रात लवकरच भाजपचे सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka minister shashikala Jolle comment on thakre government in Shirol

कर्नाटकच्या मंत्री जोल्ले यांचा शिरोळमध्ये गौप्यस्फोट

महाराष्ट्रात लवकरच भाजपचे सरकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिरोळ - कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल, असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. जोल्ले यांच्या विधानामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ, ही मोहीम अद्याप सोडलेली नाही हे स्पष्ट होत आहे.

मंत्री जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले खासगी दौऱ्यावर शिरोळ तालुक्‍यात आले होते. भाजपचे नेते अनिलराव यादव यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षीची महापुराच्या काळात कर्नाटक व महाराष्ट्रातील जनतेने झळ सोसली आहे. त्या वेळी दोन्ही राज्यांत समन्वय नव्हता. यामुळे यावर्षी महारष्ट्रातील आघाडी सरकार व कर्नाटक राज्यातील भाजपचे सरकारने महापुराबाबत समन्वय साधून पाण्याचे नियोजन केले आहे. यामुळे सध्या तरी महापुराचा धोका नाही.’’

वाचा - कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या गेली दहा हजारांवर 

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळची सध्याची स्थिती काय आहे, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाचे संकट सध्या आहे. हे संकट दूर झाल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार निश्‍चित येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर राज्यात भाजपचेच सरकार पाहिजे.’’ याप्रंसगी अनिलराव यादव, पृथ्वीराज यादव, भाजप नगरसेवक, पंडित काळे, डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख, नगरसेविका विदुला यादव, विजय आरगे आदी उपस्थित होते.

संपादन - मतीन शेख