राज्यात गो-हत्या प्रतिबंध कायदा करणार ; मंत्री प्रभू चव्हाण 

karnataka state will enact a law banning cow killing Minister Prabhu Chavan
karnataka state will enact a law banning cow killing Minister Prabhu Chavan

निपाणी - पशुसंगोपन हा रोजगार मिळवून देणारा व्यवसाय असून त्याचे दिवसेंदिवस महत्व वाढत आहे. राज्य सरकारने पशुसंगोपन खात्यात आमुलाग्र बदल केले असून लवकरच गो-हत्या प्रतिबंध कायदा करणार असल्याचे प्रतिपादन पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी केले.  

चिक्कोडी रोडवरील जनावरांचा बाजार आवारात नव्याने उभारल्या जाणाऱ्या पशुसंगोपन केंद्र इमारत बांधकामाचा प्रारंभ करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले होत्या. 

प्रथम कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर भूमिपजून झाले. मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यामुळे निपाणीत पशुसंगोपन केंद्राची नवीन इमारत होत असल्याचे सांगून मंत्री चव्हाण म्हणाले, निपाणी महत्त्वाचे केंद्र असून येथे पशुसंगोपन केंद्रासाठी सुसज्जीत इमारतीची गरज होती. सध्या इमारतीसाठी ३९ लाखाचा निधी मंजूर असून पुन्हा वाढीव २१ लाख रुपयांचा निधी घोषीत करत आहोत. प्राणी कल्याण मंडळ स्थापना, पशु संजीवनी अॅम्ब्युलन्स, गो-आयोग सेवा,  वाॅररुम असे उपक्रम खात्याने राबविले आहेत. लिंम्पी, लाळखुरकतसह विविध साथीच्या आजारावर लसीकरणाच्या माध्यमातून नियंत्रण मिळविले आहे. गो-रक्षणाची गरज अोळखून गायी खरेदीसाठी अनुदान न देता थेट गायींचे वाटप ड्राॅ पध्दतीने करणार आहोत. निपाणी भागातील अन्य पशु केंद्राच्या इमारतीसह केंद्रात मनुष्यबळ पुरविण्यासाठी प्रय़त्न करू. 


मंत्री जोल्ले म्हणाल्या, पशुसंगोपन व दुग्धोत्पादन हे शेतीला पूरक असणारे मुख्य व्यवसाय आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिल्यास उत्पनात भर पडणार आहे. निपाणीत सध्या असणारे केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात व अडचणीच्या जागेत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र शहराबाहेर हलविणे आवश्यक होते. जागेची अडचण होती, मात्र आपण एपीएमसीमध्ये केंद्रासाठी १ एकर जागा देण्याचा ठराव केल्यावर खात्याकडून त्याला मंजूरी मिळाली. शिवाय निधीही मंजूर झाला आहे.  मंजूर निधी कमी असून मंत्री चव्हाण यांनी वाढीव निधी द्यावा. निपाणी ग्रामीण भागात अद्याप चार ते पाच पशु केंद्राच्या इमारती कालबाह्य झाल्या आहेत. इमारतीसह तेथे अधिकारी, कमर्चाऱयांच्या जागा मंजूर कराव्यात. 

खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, एपीएमसीने १ एकर जागा दिली तरी जागा खरेदीसाठी पशु खात्याकडे रक्कम नव्हती. मात्र जिल्हा पंचायतीने जागा खरेदीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पशु केंद्राच्या निमिर्तीसाठी चालना मिळाली आहे. 
यावेळी प्राणलिंग स्वामी,  पशुसंगोपन आयुक्त बसवराज एच,  हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, अमित साळवे, सुमित्रा उगळे, पप्पू पाटील, पवन पाटील, प्रणव मानवी, अनुराधा चौगुले, अनिता देसाई, सरोजा जमदाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. डाॅ. अशोक कोळ्ळा यांनी स्वागत तर  डाॅ. जयकुमार कंकणवाडी यांनी प्रास्ताविक केले. रमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मंत्री प्रभू यांचे मराठीतून भाषण

मंत्री प्रभू चव्हाण हे बिदर येथील असून त्यांची मातृभाषा कन्नड तर शिक्षण मराठी माध्यमातून महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी उपस्थितांकडून मंत्री चव्हाण यांना मराठीत संवाद साधण्याचे आवाहन केले. मंत्री चव्हाण मराठीतून भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com