esakal | कुण्डलिनीस्वरूपा श्री अंबाबाई...!  करवीर महात्म्यातील निवडक स्त्रोतांमधून देवीचे होणारे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Karveer resident Ambabai navratr festival story by sambhaji agandmale

भाविकांविना उत्सव ः घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ 

कुण्डलिनीस्वरूपा श्री अंबाबाई...!  करवीर महात्म्यातील निवडक स्त्रोतांमधून देवीचे होणारे दर्शन

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची महाशक्ती कुण्डलिनीस्वरूपा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, यंदाच्या उत्सवात करवीर महात्म्यातील निवडक स्त्रोतांमधून देवीचे होणारे दर्शन या संकल्पनेवर देवीच्या पूजा बांधल्या जाणार आहेत. 


सकाळी नऊच्या सुमारास श्रीपूजक शेखर मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर, सुहास जोशी, किरण लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना झाली. यावेळी परंपरेप्रमाणे तोफेची सलामी झाली. मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. दुपारी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. 


करवीर निवासिनी महाशक्ती कुण्डलिनी स्वरूपात स्थानापन्न झालेली आहे. कुण्डलिनी हीच आत्मशक्ती. निर्माण, पालन आणि संहाराची शक्ती. ही कुण्डलिनीच प्राणशक्ती, आधारशक्ती आणि त्यामुळेच परब्रम्हस्वरूपा असे या पुजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मकरंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. 
यंदा उत्सव भाविकांविना होत असून श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासाठी शहरातील दहा ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा- मिठाई खाताय ? ‘बेस्ट बिफोर पाहताय का ?

. त्याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळाबरोबरच सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवर देवीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खजानीस वैशाली क्षीरसागर, सदस्य राजेंद्र जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या अश्‍विनी दानिगोंड यांच्या उपस्थितीत आज या सर्व प्लॅटफॉर्मचे अनावरण झाले. 

तुळजाभवानीची खडी पूजा 
ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात सकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली. दुपारी देवीची खडी सालंकृत पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मंदिरही भाविकांसाठी बंद असून मंदिरात परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. 
 

 संपादन - अर्चना बनगे