
कोल्हापूर ; देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्यावरचा पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध आहे, या भूप्रदेशामुळे दक्षिण भारताची सर्वार्थाने भरभराट झाली आहे. पर्यावरर्णाच्यादृष्टीने याचे स्थान इतके महत्त्वाचे आहे, की पश्चिम घाटातील 39 स्थळांना युनिस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित केले आहे. येथील माती, वनस्पती, हवामान, जलस्त्रोत, मानवी संस्कृती ही शाश्वत विकासास अनुकूल आहे. म्हणूनच पश्चिम घाट संवर्धन ही काळाची गरज आहे.
कोकण, दख्खनचे पठार आणि पश्चिम घाट या भौगोलिक रचनेत पश्चिम घाट विखुरला आहे. गुजरातच्या तापी नदीपासून पश्चिम घाटाला सुरुवात होते. येथील नवापूर ते कन्याकुमारी असा पश्चिम घाटाचा विस्तार आहे. याची लांबी 1600 किलोमीटर आणि रुंदी 48 ते 210 किलोमीटर आहे. एकूण क्षेत्रपळ 1 लाख 30 हजार चौरस किलोमीटर आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी 5 टक्के भाग सह्याद्रीच्या डोंगररांचाही समावेश होतो. हा भाग पर्यावर्णाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
जागतिक वारसा यादीतील 39 स्थळे पश्चिम घाटात आहेत. यातील कास पठार, कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी अभयारण्य ही चार ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत. पश्चिम घाटात सदाहरीत, निमसदाहरीत आणि आद्रतायुक्त पर्णझडी हे वनांचे प्रकार आढळतात.
दक्षिण भारतातील 1200 नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. 2043 धरणे आहेत. या सगळ्यातून पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात येते. स्वच्छ हवा, पाणी हे केवळ पश्चिम घाटामुळेच मिळते. याशिवाय भात, नाचणी, मसाल्याचे पदार्थ यांच्या विविध जाती केवळ पश्चिम घाटातच आहेत. प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्या असंख्य प्रजाती आढळतात. काही प्रजाती केवळ याच ठिकाणी पहायला मिळतात.
-पश्चिम घाटातील जैवविविधता (आकडे प्रजातींचे आहेत)
*सपुष्प वनस्पती - 4500
*वृक्ष प्रजाती - 490
*ऑर्किंड - 245
*पृष्ठवंशीय प्राणी - 325
*उभयचर प्राणी - 138
*सरपटणारे प्राणी - 161
*सस्तन प्राणी - 120
*पक्षी - 508
*मासे - 104
-पश्चिम घाटातील जंगले
*राखीव जीवरक्षावने - 2
*राष्ट्रीय उद्याने - 14
*वन्यजीव अभयारण्ये - 45
*वाघ संरक्षण क्षेत्र - 5
*हत्ती राखीव क्षेत्र - 4
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.