चित्रपट महामंडळाच्या कारभाराचा खेळखंडोबा

संभाजी गंडमाळे
Saturday, 31 October 2020

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मर्जीतील सभासदांच्या अक्षम्य चुकांवर पडदा घालण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी माजी अध्यक्ष विजय पाटकर, माजी कार्यवाह रणजित जाधव, संचालक सतीश रणदिवे, सतीश बीडकर उपस्थित होते.

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मर्जीतील सभासदांच्या अक्षम्य चुकांवर पडदा घालण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी माजी अध्यक्ष विजय पाटकर, माजी कार्यवाह रणजित जाधव, संचालक सतीश रणदिवे, सतीश बीडकर उपस्थित होते.

श्री. यमकर म्हणाले, ""कोरोना संकट काळात चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांकडून मनमानी कारभार सुरू होता. या कालावधीत रोजचे जगणे मुश्‍किल झाले असताना महामंडळाच्या गरजू सभासदांना मदत म्हणून वाटण्यात येणारे गृहोपयोगी साहित्य, साखर, तेल अशा गोष्टी काही मर्जीतील संचालकांनी लाटले. अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई न करताच याबाबत जाब विचारणाऱ्या माझ्यासारख्या निरपराध व्यक्तीवर खोटा दोन लाखांचा धनादेश चोरीचा आरोप केला. यापेक्षाही 54 वर्षांची परंपरा असलेल्या चित्रपट महामंडळाचे अस्तित्वच घालवून ही संस्था महाकला मंडळसारख्या संस्थेत सामील केली जात आहे. यामागे अध्यक्षांचा नक्कीच स्वार्थ असून, त्याला सर्व कलाकारांचा विरोध आहे.'' 

रोकड हिशेबातच नाही 
काही लोकांनी कलाकारांसाठी रोख स्वरूपात मदत केली होती. याबाबतची नेटकी नोंद मात्र ठेवलेली नाही. मदत स्वरूपात आलेल्या रकमेतील काही रक्कम ही जेवणावळीवरही उधळल्याचा आरोप रणजित जाधव यांनी केला. 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khelkhandoba of the management of the Film Corporation