केनवडे येथील अपघातात एक जागीच ठार...

Killed on the spot in an accident at Kenwade
Killed on the spot in an accident at Kenwade
Updated on

म्हाकवे - कागल मुरगुड राज्यमार्गावर केनवडे फाटा (ता.कागल) येथील चौकात बस आणि मोटरसायकलच्या  अपघातात गोरंबे (ता. कागल) येथील संजय शिवाजी चोपडे हे जागीच ठार झाले तर आखिलेश  कांबळे हे गंभीर जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,केनवडे गोरंबे फाटा येथे इंडोकाऊन्टचे कामगार आणण्यासाठी  आलेली बस (एम.एच.-०९.बी.सी. - ९२९७) ही केनवडे फाट्यावर आली असता गोरंबेहून (एम.एच- ०९ .डी.डल्ब्यू ७३४२) या दुचाकीवरून एम आय डी सी कडे कामावर  जात असलेले अखिलेश पोपट कांबळे (वय- २६) व संजय शिवाजी चोपडे ( वय -५०) हे दोघे दुचाकी गाडीवरून जात होते. केनवडे फाटा येथील चौकात आल्यावर दुचाकी गाडीला बसची धडक बसली. त्यामध्ये संजय चोपडे हे जागीच ठार झाले. तर अखिलेश कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापुर येथील सी.पी.आर. दवाखान्यात दाखल केले आहे आहे. चोपडे हे सावर्डे परिसरात तेल विकण्यासाठी जात होते. ते गरीब कुटुंबातील व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या मुत्यृमुळे नागरिकांत शोककळा पसरली आहे. सदर अपघाताची नोंद कागल पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com